ETV Bharat / state

कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी, पावसामुळे काम संथगतीने - Dhule latest news

संततधार पावसामुळे परिसरातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सोमवारी दुपारी महामार्गावरील कोडाईबारी घाटात मोठी दरड कोसळ्याने रस्त्यावर मोठमोठे दगड पडल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

 कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी, पावसामुळे काम संथ गतीने

author img

By

Published : Aug 17, 2020, 5:29 PM IST

धुळे - सुरत महामार्गावर विसरवाडीपासून दहा कि.मी अंतरावर असलेल्या कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

गेल्या पाच दिवसांपासुन विसरवाडी परिसरात रात्रदिवंस मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे परिसरातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सोमवारी दुपारी महामार्गावरील कोडाईबारी घाटात मोठी दरड कोसळ्याने रस्त्यावर मोठमोठे दगड पडल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

याबाबत महामार्ग वाहतूक पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक काझी, पोलीस उपनिरीक्षक पाटील, हे.कॉ.गोरख चव्हाण, सुपडु राठोड, ईश्वर ठाकरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जे.सी.बी.मशीन मागवुन महामार्गावरील रस्त्यावर पडलेले दगडे, रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. परंतु गेल्या सहा तासापासुन महामार्गावर वाहनांची कोंडी झाल्याचे दिसुन येत आहे. एकसारखा पाऊस पडत असल्याने दरड उचलण्याचे काम कासव गतीने चालत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी हैराण झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.