धुळे - आज देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी या देशातील कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही. कामगारांसाठी न्यायालयीन प्रक्रिया साधी आणि सोपी करायला हवी, असे मत धुळे जिल्हा औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी व्यक्त केले. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी बांगर यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
बांगर म्हणाले, आजही या राज्यात आणि देशात कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. कंत्राटी पद्धत आणि रोजंदारीचा विषय हा अतिशय गंभीर असून यावर काम होणे गरजेचे आहे. बालकामगारांचा प्रश्न अतिशय महत्वाचा असून त्यांना शिक्षणाचा हक्क मिळणे गरजेचे आहे. कामगारांचे प्रश्न न्यायालयाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सोपी होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.