ETV Bharat / state

धुळ्यात आज 'जनता कर्फ्यू'; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

author img

By

Published : Jun 1, 2020, 2:41 PM IST

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आज 1 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण दिवसभर जनता कर्फ्यू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जनता कर्फ्यू
जनता कर्फ्यू

धुळे - महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढतच असून परिस्थिती गंभीर रूप घेत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आज 1 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण दिवसभर जनता कर्फ्यू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. या आवाहनाला जनतेने उत्तम प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.

धुळ्यात आज 'जनता कर्फ्यू' ; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आलेल्या 61 अहवालांपैकी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 162 झाली आहे. आतापर्यंत 81 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 62 जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील शिरपूर तालुका कोरोना हॉटस्पॉट ठरला असून सर्वाधिक रुग्ण शिरपूर तालुक्यात आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवारी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.