धुळे - तालुक्यातील साक्रीत प्रथमच पेट्रोल 100 पार गेलं आहे. एकीकडे कोरोनामुळे नागरिक आधीच हातबल झाले आहेत, त्यात आणखी भर म्हणजे पेट्रोलचे दर वाढल्याने, जीवनावश्यक वस्तुंचे दर गगणाला भिडले आहेत, याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे.
नागरिकांच्या खिशाला भुर्दंड
धुळे जिल्ह्यात बुधवारी प्रथमच पेट्रोलने शंभरी गाठली असून, यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. सामान्य नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक बाबींमध्ये आता पेट्रोलचाही समावेश होतो. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे माहागाई देखील वाढली. याची झळ आता नागरिकांना बसत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अनेकांनी रोजगार गमावला आहे, अशा परिस्थितीमध्ये पेट्रोलचे दर वाढल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - अंगावरील कपडे काढताच रुग्णालयाने परत केले पैसे; नाशिकातील घटना