ETV Bharat / state

धुळ्यात 70 लाख रुपयांचा दारूसाठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

याप्रकरणी धर्मराज जिले सिंह (रा.हरियाणा), मंजुनाथ रामअण्णा सिरंजी (रा.कर्नाटक), ओमप्रकाश रामफल जत्त्त (रा.हरियाणा) परवीन धर्मवीर लसकरी (रा.हरियाणा) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

dhule
जप्त केलेले ट्रक
author img

By

Published : Dec 29, 2019, 4:31 AM IST

धुळे- जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी याठिकाणी होणारी दारूची अवैध वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. कारवाईत पथकाने ७० लाख ०२ हजार ५०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला असून 4 आरोपींना अटक केली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाईचा धडाका लावल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जप्त केलेले ट्रक

जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील मुंबई-आग्रा महामार्गावर दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून याठिकाणाहून (एच.आर.६१ ए.९८८९) क्र. टाटा कंपनीचा टँकर ज्यात २१ हजार लिटर दारूचे ब्यारल, (एच.आर ५५ एन.०६११) क्र. टाटा कंपनीचा टँकर ज्यात २५ हजार लिटर दारूसाठा, आयशर कंपनीचा टेम्पो ज्यात २०० लिटर क्षमतेचे २२ प्लॅस्टिकचे ब्यारल, (एम.एच १८ ए.ए ६६४२) क्रमांकाची महिंद्रा कंपनीची पिकअप व्हॅन ज्यात २०० लिटर क्षमतेचे ८ प्लॅस्टिक ब्यारल, असा सुमारे ७० लाख २ हजार ५०० रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी धर्मराज जिले सिंह (रा.हरियाणा), मंजुनाथ रामअण्णा सिरंजी (रा.कर्नाटक), ओमप्रकाश रामफल जत्त्त (रा.हरियाणा) परवीन धर्मवीर लसकरी (रा.हरियाणा) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- धुळ्यात वसतिगृहामध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी याठिकाणी होणारी मद्याची चोरटी वाहतूक रोखून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ७० लाख ०२ हजार ५०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाईचा धडाका लावला असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

Body:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील मुंबई आग्रा महामार्गावर मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून याठिकाणाहून एचआर ६१ ए ९८८९ क्रमांकाचा टाटा कंपनीचा टँकर ज्यात २१ हजार लिटर मद्याचे ब्यालर, एचआर ५५ एन ०६११ क्रमांकाचा टाटा कंपनीचा टँकर ज्यात २५ हजार लिटर मद्याचा साठा, आयशर कंपनीचा टेम्पो ज्यात २०० लिटर क्षमतेचे २२ प्लॅस्टिकचे ब्यालर, एमएच १८ ए ए ६६४२ क्रमांकाची महिंद्रा कंपनीची पिकअप व्हॅन ज्यात २०० लिटर क्षमतेचे ८ प्लॅस्टिक ब्यालर असा सुमारे ७० लाख २ हजार ५०० रुपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, याप्रकरणी धर्मराज जिले सिंह (रा हरियाणा ) , मंजुनाथ रामअण्णा सिरंजी ( रा कर्नाटक ), ओमप्रकाश रामफल जत्त्त (रा हरियाणा ) परवीन धर्मवीर लसकरी ( रा हरियाणा) या चौघांना अटक करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाईचा धडाका लावला असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.