ETV Bharat / state

कुंपनच जेव्हा शेत खाते..! धुळ्यामध्ये पोलिसांकडूनच अवैध वाळू उपसा - धुळे

शुक्रवारी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे कर्मचारी शासनाच्या गाड्या आणून पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करत होते.

कुंपनच जेव्हा शेत खाते..! धुळयामध्ये पोलिसांकडूनच अवैध वाळू उपसा
author img

By

Published : Jun 22, 2019, 6:12 PM IST

धुळे - धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे पोलिसांनीच अवैधरित्या वाळू उपसा केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे कर्मचारी शासनाच्या गाड्या आणून पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करत होते. हा प्रकार गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असून याला कोण आळा घालणार ? हा मोठा प्रश्न आहे. तर हा वाळू उपसा त्वरित थांबवावा, अशी मागणी कुसुंबा येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

वाळू उपसा करताना पोलीस
वाळू उपसा करताना पोलीस

संपूर्ण धुळे जिल्ह्यात अवैधरित्या वाळूचा उपसा सर्रासपणे सुरू आहे. याकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. वाळूचा उपसा केल्याने नदीमधील पाण्याची पातळी खालावते, परिणामी नदी कोरडी पडते, अशा वेळी वाळूचा अवैधरित्या होणारा उपसा थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची गरज असते. मात्र, प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याने प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

कुंपनच जेव्हा शेत खाते..! धुळयामध्ये पोलिसांकडूनच अवैध वाळू उपसा

धुळे जिल्ह्यात वाळू माफियांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, जर कुंपणच शेत खात असेल तर कारवाई कोणावर करायची ? असा प्रश्न पडतो. याचाच प्रत्यय धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात पाहायला मिळत आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात गेल्या 6 महिन्यांपासून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे कर्मचारी हे शासनाच्या गाड्या आणून पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करत आहेत. तर 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा होत असताना याठिकाणी पोलीस कर्मचारी नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्यात मग्न होते. पोलिसांची गाडी आणि स्वतः पोलीस या ठिकाणी वाळूचा उपसा करण्यासाठी येत असल्याने याबाबत बोलण्याचे नागरिकांचे धाडस होत नाही.

त्यामुळे गावकरी प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्यास नकार देत आहेत. याबाबत गावकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, आम्हाला प्रभारी समादेशक सदाशिव पाटील यांचे आदेश आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तसेच ही वाळू शासनाच्या मंजूर कामांसाठी वापरण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Intro:संपूर्ण देशात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ चे कर्मचारी शासनाच्या गाड्या आणून पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करत होते. हा प्रकार गेल्या ६ महिन्यांपासून सुरु असून याला आळा कोण घालणार ? हाच मोठा प्रश्न आहे. हा वाळू उपसा त्वरित थांबवावा अशी मागणी कुसुंबा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Body:संपूर्ण धुळे जिल्ह्यात अवैधरित्या वाळूचा उपसा सर्रासपणे सुरु असून याकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे. वाळूचा उपसा केल्याने नदीमधील पाण्याची पातळी खालावते, परिणामी नदी कोरडी पडते. अश्या वेळी वाळूचा अवैधरित्या होणार उपसा थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची गरज असते. मात्र प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याने याकडे प्रशासन दुर्लक्ष करत. धुळे जिल्ह्यात वाळू माफियांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र जेव्हा कुंपणच शेत खात तेव्हा कारवाई करायची कोणावर ? असा प्रश्न पडतो. आणि याचाच प्रत्यय सध्या धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात पाहायला मिळतोय. धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात गेल्या ६ महिन्यांपासून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ चे कर्मचारी हे शासनाच्या गाड्या आणून पांझरा नदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करत आहेत. २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा होत असतांना याठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ चे कर्मचारी हे शासनाच्या गाड्या आणून पांझरा नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्यात मग्न होते. पोलिसांची गाडी आणि स्वतः पोलीस याठिकाणी वाळूचा उपसा करण्यासाठी येत असल्याने याबाबत बोलण्यासाठी गावकऱ्यांमध्ये भितीच वातावरण आहे, यामुळे गावकरी प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्यास नकार देत आहेत. याबाबत गावकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आम्हाला प्रभारी समादेशक सदाशिव पाटील यांचे आदेश आहेत,असे त्यांनी सांगितले. तसेच हि वाळू शासनाच्या मंजूर कामांसाठी वापरण्यात येते. आणि याचे बिल शासनाकडून मंजूर केले जाते अशी दबक्या आवाजात चर्चा यावेळी सुरु होती अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. पांझरा नदी पात्रातून होणारा वाळूचा उपसा थांबवून पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.