ETV Bharat / state

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे 'गुंजन'चा अपघात; स्थानिकांचा आरोप - जागीच मृत्यू

साक्री रोड भागात झालेल्या अपघातात गुंजन पाटील या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घेटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

धुळे
author img

By

Published : Jul 30, 2019, 8:42 AM IST

धुळे- शहरातील साक्री रोड भागात शुक्रवारी झालेल्या अपघातात गुंजन पाटील या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

धुळे शहरातील साक्री रोड भागातील सिंचन भवन समोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने गुंजन पाटील नावाच्या विद्यार्थिनीला चिरडले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाने याठिकाणी असलेल्या झाडाची कत्तल केली आणि हा अपघात झाडांमुळे झाला असल्याचा अजब दावा केला.

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गुंजनचा अपघात, स्थानिकांचा आरोप

याठिकाणी दुभाजक नसून याबाबत वारंवार प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून देखील याठिकाणी दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत. तसेच रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यत अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाऊ नये हे बंधनकारक असताना देखील शहरात अवजड वाहने येत असतात. या घटनेस जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धर्मेंद्र झालटे आणि एजाज शहा यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Intro:धुळे शहरातील साक्री रोड भागात झालेल्या अपघातात गुंजन पाटील या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Body:धुळे शहरातील साक्री रोड भागातील सिंचन भवन समोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने गुंजन पाटील नावाच्या विद्यार्थिनीला चिरडले, या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गेल्या 2 दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर प्रशासनाने याठिकाणी असलेल्या झाडाची कत्तल केली. हा अपघात झाडांमुळे झाला असल्याचा अजब दावा प्रशासनाने केला. याबाबत ईटीव्ही भारतने स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, गुंजनच्या अपघाताला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याठिकाणी दुभाजक नसून याबाबत वारंवार प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून देखील याठिकाणी दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत तसेच रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यत अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाऊ नये हे बंधनकारक असतांना देखील शहरात अवजड वाहने येतात कशी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. या घटनेस जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धर्मेंद्र झालटे आणि एजाज शहा यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.