ETV Bharat / state

विहिरीचे अनुदान मिळावे या मागणीसाठी शेतकरी कुटुंबाचा दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न - Hospital

विहिरीचे अनुदान बँक खात्यात जमा व्हावे म्हणून प्रकाश धनगर आणि त्यांच्या पत्नीने यापूर्वी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी पत्नी आणि दोन मुलांसह विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

आत्महत्येचा प्रयत्न करणारे कुटुंब
author img

By

Published : Jul 22, 2019, 5:28 PM IST

Updated : Jul 22, 2019, 5:41 PM IST

धुळे - सिंचन विहिरीच्या अनुदानासाठी शेतात खोदकाम सुरू असलेल्या विहिरीजवळच शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. दोंडाईचा व नंदुरबार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील सदस्यांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.

शेतकरी कुटुंब

शेतकरी प्रकाश पोपट धनगर यांना त्यांच्या गट क्र. ८३/१/३ मध्ये १.३५ आर क्षेत्र असलेल्या शेतात सिंचन विहीर मंजूर झाली आहे. शिंदखेडा पंचायत समितीच्या अभियंत्याकडून आखणी करून खोदकामही झाले आहे. सर्व अटींचे पालन करूनही कोणतेही अनुदान बँक खात्यात जमा न झाल्याने या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यापूर्वीही १ एप्रिलला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्नीसह अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला होता. मात्र, त्यानंतरही न्याय न मिळाल्याने त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले.

मोयाणे शिवार हे नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. प्रकाश धनगर हे पत्नी योगिताबाई धनगर, मुलगा भूषण धनगर व निखिल धनगर यांच्यासह सोमवारी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ पोहचले. यानंतर त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. पोलिसांकडे कोणतेही वाहन नसल्याने सुमारे तासभर हे कुटुंब रस्त्यावर पडून उलट्या करत होते. त्यामुळे त्यांचे कपडे रक्ताने माखले. घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. पोलिसांचे वाहन तासाभरानंतर पोहचले. त्यावेळी पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेऊन वाहनाने नंदुरबार येथे नेले. तेथील जिल्हा रूग्णालयात दाखल करताच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या शरीरातील विष बाहेर काढण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

Intro:सिंचन विहिरीच्या अनुदानासाठी शेतात खोदकाम सुरू असलेल्या विहिरीजवळच येथील शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. दोंडाईचा व नंदुरबार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कुटुंबातील सदस्यांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.
Body:शेतकरी प्रकाश पोपट धनगर यांना त्यांच्या गट क्र. ८३/१/३ मध्ये १.३५ आर क्षेत्र असलेल्या शेतात सिंचन विहीर मंजूर झाली असून शिंदखेडा पंचायत समितीच्या अभियंत्याकडून आखणी करून खोदकामही झाले आहे. सर्व अटींचे पालन करूनही कोणतेही अनुदान बॅँक खात्यात जमा न झाल्याने या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यापूर्वीही १ एप्रिल रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्नीसह अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्यासतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला होता. मात्र त्यानंतरही न्याय न मिळाल्याने त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले.
मोयाणे शिवार हे नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे.
धनगर हे पत्नी योगिताबाई धनगर, मुलगा भूषण धनगर व निखिल धनगर यांच्यासह सोमवारी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ पोहचले त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. पोलिसांकडे कोणतेही वाहन नसल्याने सुमारे तासभर हे कुटुंब रस्त्यावर पडून उलट्या करत होते. त्यामुळे त्यांचे कपडे रक्ताने माखले. घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. पोलिसांचे वाहन तासाभरानंतर पोहचले. त्यावेळी पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेऊन वाहनाने नंदुरबार येथे नेले. तेथील जिल्हा रूग्णालयात दाखल करताच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या शरीरातील विष बाहेर काढण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.Conclusion:
Last Updated : Jul 22, 2019, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.