धुळे - युवासेनेच्या आदित्य ठाकरे फुड बँकेच्या माध्यमातून संकलीत झालेल्या किराणा गरजू लोकापर्यंत पोहचविण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 11 जून) शहरातील साक्री रोड परिसरात गरजू महिला आणि कलावंतांना 25 किराणा किटचे वाटप करण्यात आले.
युवासेनेच्या वतीने संचारबंदीच्या कालावधीत गरीब व गरजू लोकांच्या घरात चुल पेटावी या उद्देशाने आदित्य ठाकरे फुड बँक सुरू करत या फुड बँकेत किराणा संकलीत करण्यात येत आहे. हा संकलीत झालेल्या किराणा गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शुक्रवारी जमा झालेल्या किराणापैकी 25 किराणा साक्री रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या घरकाम करणाऱ्या गरजू महिला तसेच कलावंत महिलांना वाटप करण्यात आले. टाळेबंदीमुळे या घटकांच्या हातातील रोजगार बुडाल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी युवासेनेच्या वतीने घरपोच मदत पोहोचविण्यात आली.
यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख पंकज गोरे, योगेश वाघ, तमाशा परिषदेचे शेषराव गोपाळ उपस्थित होते. आतापर्यंत युवासेनेच्या वतीने समाजातील वेगवेगळ्या घटकापर्यंत मदत पोहचविण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे दीड हजार जणांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा - धुळे : शिरपूर शहराजवळ बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त