धुळे - शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ शनिवारी रसायन कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या घटनेचे काही फेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळाची काही दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपली. ही दृश्य काही वेळातच प्रचंड व्हायरल झाली. मात्र, यासोबत काही फेक व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहेत. अशा घटना घडल्यानंतर नागरिकांनी काळजीपूर्वक सोशल मीडियाचा वापर करणे गरजेचे असते. मात्र, भावनेच्या भरात अनेक वेळा नागरिक कोणतीही शहानिशा न करता आलेले व्हिडिओ व्हायरल करतात. याचाच प्रत्यय या घटनेत आला आहे.