ETV Bharat / state

मुंबई लोकलसेवा पूर्ववत होईपर्यंत बेस्टच्या मदतीला धावून गेली धुळ्याची 'लालपरी' - dhule bus depot news

मुंबईची लोकलसेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत बेस्टच्या बरोबरीने धुळ्याची लालपरी ही आपले कार्य मुंबईत ठामपणे बजावणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली आहे.

धुळ्याची 'लालपरी'
धुळ्याची 'लालपरी'
author img

By

Published : Oct 22, 2020, 3:31 PM IST

धुळे - मुंबईची बंद असलेली लोकलसेवा सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोड्याफार प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी सध्या प्रवाशांचा संपूर्ण ताण हा बेस्ट बसच्या सेवेवर आल्याचे दिसत आहे. यामुळेच हा ताण कमी करण्यासाठी धुळ्याची लालपरी मुंबईच्या प्रवाशांसाठी धावून गेली आहे.

माहिती देताना विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ

धुळे परिवहन विभागातर्फे तब्बल 100 बसेस बेस्टच्या मदतीसाठी धुळ्यातून रवाना करण्यात आल्या आहेत. बसेस बरोबर सव्वाचारशे कर्मचारीदेखील पाठवण्यात आले आहे. हे कर्मचारी पंधरा दिवस आपली सेवा देऊन पुन्हा धुळ्यात परतणार आहेत. त्यांच्या जागी दुसरे सव्वाचारशे कर्मचारी आपली सेवा देण्यासाठी धुळ्यातून मुंबईकडे रवाना होतील अशी माहिती विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली आहे. जोपर्यंत मुंबईची लोकलसेवा पूर्ववद सुरू होत नाही, तोपर्यंत बेस्टच्या बरोबरीने धुळ्याची लालपरी ही आपले कार्य मुंबईत ठामपणे बजावणार असल्याची देखील माहिती मनिषा सपकाळ यांनी दिली आहे.

हेही वाचा - 140 वर्षांची परंपरा होणार खंडित, धुळ्यातील बालाजीचा रथ उत्सव रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.