ETV Bharat / state

धुळे पोलिसांची मोठी कारवाई; एसयूव्हीमधून जप्त केल्या 90 तलवारी, 4 जणांना अटक - तलवार जप्त सोनगीर पोलीस

सोनगीर पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त ( Dhule Police Seize 90 Swords ) केला आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनाची तपासणी केली. या वाहनात त्यांना 90 तलवारी ( Swords Seize Dhule News ) आढळून आल्या.

dhule police seize 90 swords
तलवार जप्त धुले पोलीस
author img

By

Published : Apr 28, 2022, 12:03 PM IST

Updated : Apr 28, 2022, 1:43 PM IST

धुळे - सोनगीर पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त ( Dhule Police Seize 90 Swords ) केला आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनाची तपासणी केली. या वाहनात त्यांना 90 तलवारी ( Swords Seize Dhule News ) आढळून आल्या. वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वाहन वेगाने पळवल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी वाहनाचा पाठलाग करून त्यास गाठले.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - Nitin Gadkari : येत्‍या तीन वर्षात धुळ्यातील रस्‍ते अमेरिकेच्‍या दर्जाचे असतील - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सोनगीर पोलीस ( Songir Police swords seize ) पेट्रोलिंग करीत असताना शिरपूरकडून धुळेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच.09 एम. 0015 ला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता ती सुसाट पळवली. म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून गाडी थांबवून विचारणा केली. गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता गाडीत 90 तलवारी आढळून आल्या. सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींसोबत ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद शरीफ मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम, कपिल विष्णू दाभाडे सर्व राहणार जालना येथील असून त्यांच्याकडून स्कॉर्पिओ गाडी, 90 तलवारीसह 7 लाख 13 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 व मोटार वाहन कायदा कलम 184, 239/ 177 प्रमाणे सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हे तलवारी चित्तोडगड येथून जालना येथे घेऊन जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यांचा हेतू काय होता, याचा तपास सध्या धुळे पोलीस करीत आहेत. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, विभागीय पोलीस उपाधीक्षक प्रदीप मैराळे, सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपस्थित होते.

हेही वाचा - धुळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी सरस्वतींचे वादग्रस्त विधान, तरुणांना तलवार बाळगण्याचे केले आवाहन

Last Updated : Apr 28, 2022, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.