ETV Bharat / state

कर्जाचा बोजा अन् अतिवृष्टीचा फटका, शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या - अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे शेतातील कपाशी व बाजरीचे वाया गेले. त्यातच त्याच्यावर 4 लाख रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली.

प्रवीण उर्फ राजेंद्र भालचंद्र भदाणे
author img

By

Published : Oct 29, 2019, 6:19 PM IST

धुळे - अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्याने शनिवारी (26 आक्टोबर) विष घेतले. मात्र, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - तामिळनाडू : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, मृतदेह हाती

धुळे तालुक्यातील खंडलाय येथील प्रवीण उर्फ राजेंद्र भालचंद्र भदाणे (वय 38), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमूळे संपूर्ण पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी विष घेतले. औषध पिऊन घरी आल्यानंतर त्यांना चक्कर येऊ लागली. तसे त्यांनी घरी सांगितल्यानंतर घरातील नातेवाईकांनी धुळ्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

राजेंद्र भदाणे यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रवीण भालचंद्र पाटील यांच्या वडिलांच्या नावावर शेती असून ती शेती स्वतः करीत होते. त्यांच्यावर 4 लाख 3 हजार रुपयांचे कर्ज आहे. ठिबक सिंचन व बि-बियाण्यांसाठी पंजाब नॅशनल बँक धुळे येथून कर्ज घेतलेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतात कपाशी, बाजरी, भुईमूग यांची लागवड केली होती. मात्र, पावसाच्या कहरामुळे पूर्ण पिकांचे नुकसान झाले असून कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली.

दोन दिवसांपासून शेतीची अवस्था पाहून भदाणे हे दररोज बडबडत असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले. राजेंद्र भदाणे यांच्या पश्चात वडील, पत्नी, 12 वर्षाची मुलगी, 10 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा - इंदूरमध्ये भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर

Intro:अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून धुळे तालुक्यातील खंडलाय येथील एका 38 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले होते मात्र मंगळवारी उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.Body:धुळे तालुक्यातील खंडलाय येथिल प्रवीण उर्फ राजेंद्र भालचंद्र भदाणे (पाटील)वय 38 या तरुण शेतकऱ्यांने स्वतःच्या शेतात अतिवृष्टी मुळे शेतात संपूर्ण पिकांचे नुकसान झालेले पाहून दिनांक 26 रोजी विषारी औषध पिऊन घरी आले व मला चक्कर येत आहे असे गावकरी व घरातील नातेवाईकांना सांगितले, त्यावेळी त्यास उलटी होत होती म्हणून राजेंद्र भदाणे यांना धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले, राजेंद्र भदाणे याच्यावर उपचार सुरू असताना दिनांक 29 रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवीण भालचंद्र पाटील यांच्या वडिलांच्या नावावर शेती असून ती शेती स्वतः करीत होते,त्यांच्यावर रुपये चार लाख तीन हजार रुपयांचे ठिबक व पीक कर्जासाठी पंजाब नॅशनल बँक धुळे येथून कर्ज घेतलेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतात कपाशी बाजरी भुईमूग याची लागवड केलेली होती मात्र पावसाच्या कहरामुळे पूर्ण पिकांचे नुकसान झाले असून सदर कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली तो दोन दिवसापासून शेतीची अवस्था बघून रोज असेच बडबड करत होता असे गावातील नागरिकांनी सांगितले. राजेंद्र भदाणे यांच्या पश्चात वडील, पत्नी, 12 वर्षाची मुलगी, 10 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.