ETV Bharat / state

Dhule Cold Wave: धुळे गारठले; तापमान 5.5 अंश - धुळे गारठले

Dhule Cold Wave: शहरासहिजल्ह्यात दाेन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. शहराचे तापमान थेट 5.5 अंशांवर गेले आहे. यंदाच्या हिवाळ्यातील हे निचांकी तापमान आहे. थंडीमुळे रात्री वाजता शहरातील रस्ते निर्मनुष्य होत आहेत.

Dhule Cold Wave
Dhule Cold Wave
author img

By

Published : Dec 10, 2022, 12:23 PM IST

धुळे: धुळ्यात शनिवारच्या तापमानाची यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी धुळ्याचं तापमान ५.५ अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. 4 दिवसांत तापमान ८.७ ने खाली घसरले आहे. कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर परिणाम झाला. पहाटेच्या वेळी फिरणाऱ्यांचा तसेच व्यायाम करणाऱ्यांचा उत्साह कडाक्याच्या थंडीमुळे अधिकच वाढला.

धुळे गारठले; तापमान 5.5 अंश

आरोग्याची योग्य काळजी घ्यावी: थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्राकडून करण्यात आले आहे. तर थंडीचा कडाका रब्बी पिकांसाठी विशेषतः गहू, हरबरा लागवडसाठी फायदेशीर असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगतात.

4 दिवसात तापमानात घट झालीय त्यावर एक दृष्टिक्षेप: ७ डिसेंबर या दिवशी १४.२ अंश सेल्सिअस, ८ डिसेंबर या दिवशी १०.८अंश सेल्सिअस, ९ डिसेंबर या दिवशी ७.५अंश सेल्सिअस, १०डिसेंबर या दिवशी ५.५अंश सेल्सिअस, असे चार दिवसांत तापमान ८.७ अंश सेल्सिअस ने खाली घसरले.

थंडीचा जाेर वाढला: जिल्ह्यासह शहरात दिवाळीनंतर थंडी जाणवण्यास सुरुवात झाली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीचा जाेर वाढला होता. मध्यंतरी आठ दिवस गारठ्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, गेल्या दाेन दिवसांपासून पुन्हा थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.