धुळे- हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांवर धुळे शहरातील व्यवसायिकांनी कारवाई करण्याची मांगणी केली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवसायीकांकडून धुळे बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला शहरातील व्यवसायिकांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे.
काही समाजकंटकांनी हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यात हिंदू देवतांबद्दल अश्लील वक्तव्य करण्यात आले होते. या वक्तव्याचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने धुळे बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला शहरातील व्यावसायिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला होता. यामुळे बाजारपेठेतील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. हिंदू देवतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.