धुळे - महापालिकेच्या माध्यमातून शहरातील गांधी पुतळा चौकात उभारण्यात आलेल्या १५० फुट उंच तिरंगा ध्वजाचे महाराष्ट्र दिन, आणि कामगार दिनाचे औचित्य साधुन खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
धुळे मनपाच्या निधी अंतर्गत हा ध्वजस्तंभ आणि भला मोठा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. धुळ्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी पुतळा चौकात उभारण्यात आलेल्या १५० फुटाच्या ध्वजामुळे राष्ट्रभक्ती व्यक्त होत आहे.
हे होते उपस्थित -
याप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक देवेंद्र सोनार, नगरसेवक हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, नगरसेवक संजयबापु पाटील, माजी स्थायी समिती सभापती युवराज पाटील आदी उपस्थित होते.