धुळे : एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन मित्रांपैकी एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या गुदद्वारात कंपनीतील एअर हायड्रॉलिकसाठी वापरले जाणारे कॉम्प्रेशर मशीनची नळी लावून हवा भरल्याने त्या मित्राचा मृत्यू (Death of friend in Dhule) झाला. ही घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील छडवेल शिवारातील सुझलॉन कंपनीच्या एस बी - ५९ मेन मॉड १४१ या ठिकाणी घडली. मित्राचा घात करणाऱ्या त्या मित्रावर निजामपूर पोलीस स्टेशनला भादंवि ३३८ सह वाढीव कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे घटना : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील छडवेल शिवारातील सुझलॉन कंपनीच्या एस बी - ५९ मेन मॉड १४१ या ठिकाणी छडवेल गावातील एकाच गल्लीत राहणारे तुषार सदाशिव निकुंभ (वय २१), आणि हर्षल प्रकाश जाधव (वय २७) हे दोघे काम करत असतांना हर्षलने तुषार याच्या गुदद्वारात कंपनीतील एअर हायड्रॉलिकसाठी वापरले जाणारे कॉम्प्रेशर मशीनची नळी लावून हवा भरल्याने तुषारच्या पोटात हवेच्या प्रेशरने गंभीर जखमा झाल्या. त्याला नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात त्यानंतर सुरत येथील सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना तुषार सदाशिव निकुंभे याचा मृत्यू (putting air in anus with compressor machine tube) झाला.
गुन्हा दाखल : मयत तुषार याचे वडील सदाशिव बाबुलाल निकुंभ यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला हर्षल प्रकाश जाधव याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार भादंवि ३३८ सह भादंवि वाढीव कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल होऊन हर्षल प्रकाश जाधव यास अटक करण्यात आली (Death of friend) आहे. एका मित्राने दुसऱ्या मित्राचा घात केल्याने छडवेल गावात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे करत (Death of friend by putting air in anus) आहेत .