धुळे - जिल्ह्यात मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार एकूण 29 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 640 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 339 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरीत 252 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालय धुळे येथील 24 अहवालांपैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 28 पैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मंगळवारी आढळलेले रुग्ण -
1. माळी गल्ली (3)
2. पाटीलवाडा (2)
3. जैन मंदिर (3)
4. वेंकटेश नगर (2)
5. पटेल नगर (1)
6. कुंभार टेक (1)
7. वरवाडे (1)
8. खंबाळे (1)
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 3 अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
1. 50 - स्त्रिया चिलाने
2. 15 - पुरुष विद्यानगर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील 37 अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील 13, तर इतर परिसरातील 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शिरपूर 2
धुळे शहर 11
(गोदाई सोसायटी 3, साक्री रोड 2, माधावपुरा 1, देवपूर 1, मोहाडी 1, इंदिरा हौसिंग सोसायटी 1, शहर 2)
एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी धुळे शहरातील एक नाशिक येथे पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण रुग्ण संख्या 30 आहे. धुळे जिल्ह्यात नागरिकांच्या तपासणीची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
शिरपूर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव -
धुळे शहरानंतर कोरोनाने शिरपूर येथे डोके वर काढले आहे. शिरपूर तालुक्यातील स्थानिक प्रशासनाच्या वतीने कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त कोरोनाच्या तपासण्या करून रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन ते तिन दिवसांपासून प्रत्येक दिवसाला शिरपूर तालुक्यात ९० पेक्षा जास्त व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत आहेत. शिरपूर वरवाडे नगरपालिका कोरोना रोखण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. शिरपूर तालुक्यात कोरोना रूग्ण संख्येने २०० पार गेली असून, २०३ वर पोहोचली आहे. तर तालुक्यात मृत व्यक्तींची संख्या १७ इतकी आहे. तसेच ७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शिरपूर शहरात कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.