ETV Bharat / state

माजी नगरसेवकाच्या रोपवाटिकेवरून धुळ्यात वाद पेटला, प्रशासनाने जप्त केली रोपे

माजी नगरसेवक सतिष महाले यांच्या रोपवाटिकेवर महापालिकेने जप्तीची कारवाई केल्यानंतर धुळ्यात वाद पेटला असून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

नर्सरीतील रोपे
author img

By

Published : Jul 4, 2019, 1:41 PM IST

धुळे- महापालिकेचे माजी नगरसेवक सतिष महाले यांनी तयार केलेल्या रोपवाटिकेवरून धुळ्यात वाद पेटला आहे. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत रोपवाटिकेतील रोपे प्रशासनाने जप्त केली आहेत. महाले यांनी आपल्या प्रभागातील महापालिकेच्या मोकळ्या जागेत रोपवाटिका तयार केली असून गेल्या ५ वर्षांपासून ते आणि त्यांचा परिवार या रोपांची निगा राखत आहेत.

सतिष महाले

रोपवाटिकेतील ४० हजाराहून अधिक रोपे नागरिकांना मोफत देऊन महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करावे, असा प्रस्ताव सतिष महाले यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिला होता. मात्र,१ जुलै रोजी वृक्षारोपण उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमांनातर या रोपवाटिकेवर महापालिकेच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात आली.

सतिष महाले यांनी महापालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण करून रोपवाटिका तयार केली असून या भूखंडावर कब्जा करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे केलं आहे, असा आरोप नगरसेवक प्रविण अग्रवाल यांनी केला. तर राजकीय द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप सतिष महाले यांनी केला असून गेल्या ५ वर्षांपासून रोपांचे संगोपण करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

महापालिकेने जप्तीची कारवाई करत रोपे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र,रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अनेक झाडे तुटली आहेत. रोपवाटिकेवर केलेल्या कारवाईमुळे धुळ्यात राजकीय वातावरण तापलं असून यावर महापालिका काय कार्यवाही करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Intro:धुळे महापालिकेचे माजी नगरसेवक सतिष महाले यांनी तयार केलेल्या रोपवाटिकेवरून धुळ्यात वाद पेटला असून महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत या रोपवाटिकेतील झाडे प्रशासनाने जप्त केली आहेत.

Body:धुळे महापालिकेचे माजी नगरसेवक सतिष महाले यांनी आपल्या प्रभागात असलेल्या महापालिकेच्या मोकळ्या जागेत रोपवाटिका तयार केली आहे, गेल्या ५ वर्षांपासून ते आणि त्यांचा परिवार या झाडांची निगा राखत आहेत, जवळपास ४० हजाराहून अधिक झाडे या रोपवाटिकेत असून महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमात या रोपवाटिकेतील झाडे नागरिकांना मोफत देण्यात येऊन शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करावे असा प्रस्ताव सतिष महाले यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर केला होता.या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिला होता.मात्र १ जुलै रोजी वृक्षारोपण उपक्रमाच्या उदघाटन कार्यक्रमांनातर या रोपवाटीकेवर महापालिकेच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात आली. सतिष महाले यांनी महापालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण करून ही रोपवाटिका तयार केली आहे, या भूखंडावर कब्जा करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे केलं आहे असा आरोप नगरसेवक प्रविण अग्रवाल यांनी केला आहे. तर दुसरीकडे राजकीय द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आली असून आपण गेल्या ५ वर्षांपासून या वृक्षांची काळजी घेत आहोत. असा आरोप सतीश महाले यांनी केला आहे. या जप्तीच्या कारवाईनंतर महापालिकेने ही रोपे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.मात्र यात वृक्षांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अनेक झाडे तुटली आहेत. या रोपवाटिकेवरून धुळ्यात राजकीय वातावरण तापलं असून यावर महापालिका काय कार्यवाही करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.