ETV Bharat / state

धुळ्याच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट; १५ ठार, 65 गंभीर - dhule

जिल्ह्यातील शिरपूर येथील एमआयडीसीत असलेल्या एका केमिकल कंपनीत स्फोट झाल्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये १५ कर्मचारी ठार झाले असून 65 जण जखमी त्यातील १८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये ९ महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्फोटामुळे निघालेले धुराचे लोट
author img

By

Published : Aug 31, 2019, 10:40 AM IST

Updated : Aug 31, 2019, 6:47 PM IST

LIVE updates -

  • १.५५ pm - आग आटोक्यात

  • १.४५ pm - मुख्यमंत्र्यांकडून घटनेतील मृतांना ५ लाखांची मदत जाहीर

  • १.१५ pm - जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन आणि पोलीस अधीक्षक विश्वाव पांढरे घटनास्थळी दाखल

  • १२.४८ am - मृतांचा आकडा १५ वर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

  • १२.३० am - मृतांचा आकडा १३ वर मृतांमध्ये ९ महिन्याच्या बाळाचा समावेश

  • १२.०३ am - मृतांचा आकडा १० वर, तर ४८ जण जखमी

  • ११.२२ am - स्फोटात ३२ जण जखमी झाले आहेत. यांपैकी १८ जण गंभीर जखमी आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

  • ११.०० am - कंपनीतील स्फोटामध्ये ८ जाणांचा मृत्यू झाला आहे,

  • १०.१७ am - शिरपूरजवळील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

    घटनास्थळावरील दृश्य

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर येथील एमआयडीसीत असलेल्या एका केमिकल कंपनीत स्फोट झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून यामुळे संपूर्ण शिरपूर तालुका हादरला आहे. कंपनीतील १५ कर्मचारी ठार झाले असून 65 जण जखमी त्यातील १८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये ९ महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याजवळ असलेल्या वाघमोडे गावाजवळ एमआयडीसी आहे. या एमआयडीसीत असलेल्या एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण शिरपूर तालुका हादरला असून या स्फोटामुळे धुराचे लोट उंचच-उंच जात होते. हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीच्या आजूबाजूच्या गावांनाही स्फोटचा हादरा बसला आहे. कंपनीजवळील शेताती काही जनावरेही या स्फोटामुळे दगावली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील शाळा महाविद्यालयाला प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे.

मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसून या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन बंबचे देखील पाचारण करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता ठेवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

Intro:Body:

*धुळे ब्रेकिंग : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील केमिकल कंपनीत भीषण स्फोट....अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती....घटनास्थळी मदतकार्य सुरू....*

Conclusion:
Last Updated : Aug 31, 2019, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.