धुळे - चाळीसगाव मार्गावरील गरताड बारी परिसरात सोडा विक्रेत्या मारुती कारला सोमवारी सांयकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
हेही वाचा - येस बँकेच्या संस्थापकाकडून ४,३०० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग - ईडी
उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी शीतपेय, फळ विक्रेते पाहायला मिळतात. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने शीतपेय विक्रेत्यांची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निर-निराळ्या पद्धती बघावयास मिळतात. मारुती कारमध्ये फॉन्टन सोडा विकण्यात येत आहे. हा सोडा बनवण्यासाठी गॅसच्या टाक्यांचा वापर केला जातो. या गॅसच्या टाकीने पेट घेतल्यामुळे कारला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या दरम्यान, सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र, कार संपूर्ण जळून खाक झाली आह. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचले. दरम्यान,अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ येऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - 'चिकन अन् अंडी हे तर पौष्टीक पदार्थ.. बिनधास्त खा, अफवांवर विश्वास ठेऊ नका!'