ETV Bharat / state

धुळ्यात चोरांचा धुमाकूळ, पोलिसाच्याच घरी केली चोरी

पोलीस निरीक्षकांच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार धुळ्यात समोर आला आहे. घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत, चोरट्यांनी 10 ते 12 लाखांचे दागिने लंपास केले आहेत.

Increase in theft incidents in Dhule
पोलिसाच्या घरी चोरी
author img

By

Published : Nov 9, 2020, 5:15 PM IST

धुळे - चक्क पोलीस निरीक्षकांच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार धुळ्यात समोर आला आहे. आझाद नगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी केली. तब्बल 25 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळ्यातील आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे सुट्टी असल्याने आपल्या गावी गेले होते, चोरट्यांनी याचा फायदा घेत त्यांचे घर फोडून 10 ते 12 लाख रुपयांचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, याआधी देखील इथे राहत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाली होती.

धुळ्यात पोलिसाच्या घरी चोरी

शहरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ

धुळे शहरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी चोरीच्या घटना होत असतांना, सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन, चोरींच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा - मुलाच्या किरकोळ चुकीमुळे वडिलांची नदीत उडी घेऊन आत्महत्या

हेही वाचा - कल्याणमध्ये दोन गटात धुमश्चक्री; ॲसिड फेकल्याने 6 महिला होरपळल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.