धुळे - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजच्या मदतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामधून 75 बॅग रक्त संकलित करण्यात आले आहे.
लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन
कोरोना लस घेतल्यानंतर पुढील 60 दिवस रक्तदान करता येत नसल्यामुळे, लसीकरणाआधी रक्तदान करावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. या रक्तदान शिबिराला विवेकानंद प्रतिष्ठानचे राकेश गर्दे, अमोल शिंदे, महेश निकम, महेश पोतदार, धर्मेश मोरे, राहुल शिरसाठ, रोहीत धाकड, हर्षल भावसार, अमृता पाटील, लोकेश अग्रवाल, हर्षल खरे, सोनल अग्रवाल, प्रेरणा सोनवणे, प्रिया नेरकर, आदिती कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - केकेआरच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण; कोलकाता-बंगळुरूचा सामना रद्द