ETV Bharat / state

आचारसंहिता लागू असतानाही धुळे बसस्थानकावर झळकणार भाजपच्या जाहिराती - पंतप्रधान

धुळे बसस्थानकावरही भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या जाहिराती प्रसारित करण्यासाठी आयोगाने बंदी घातली होती. मात्र, आता या ठिकाणी पुन्हा एकदा जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

धुळे बसस्थानक
author img

By

Published : Apr 12, 2019, 12:32 PM IST

धुळे - आचारसंहिता लागू असल्यामूळे निवडणूक आयोगाने कोणत्याही पक्षाती जाहिराती सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित घालण्यास बंदी घातली होती. धुळे बसस्थानकावरही भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या जाहिराती प्रसारित करण्यासाठी आयोगाने बंदी घातली होती. मात्र, आता या ठिकाणी पुन्हा एकदा जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

namo tv and picture
नमो टीव्ही आणि मोदींवरील चित्रपटाची जाहिरात

निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य परिवहन मंडळाला दिले होते. परंतु, धुळे स्थानकावर ओम अॅडव्हर्टायझर्स कंपनीने भाजपच्या जाहिराती लावल्या होत्या. यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्यानंतर कंपनीने न्यायालयात धाव घेतली.

कंपनीने बसस्थानकांवर होर्डिंग्जद्वारे जाहिरात प्रसारित करण्याकरीता १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० या कालावधीसाठी अधिकृत परवानाधारकाची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. सोबतच निवडणूक आयोगाच्या परवानगीचे कागदपत्रेही सादर केली. यामुळे जाहिरात प्रदर्शित करण्याचा कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ओम अॅडव्हर्टायझर्स आणि भाजप यांच्यात जाहिराती प्रदर्शित करण्याचा करार झाला आहे. त्यामुळे आता बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी भाजपच्या जाहिराती प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने याआधी आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून मोदींवरील चित्रपट आणि नमो टीव्हीवर बंदी घातली होती. परंतु, निवडणूक आयोगाला बसस्थानकावर प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातीवर बंदी घालण्यात अपयश आले आहे.

Intro:मोदी चित्रपटावर बंदी आणि नमो टीव्हीवर बंदी आणणाऱ्या निवडणूक आयोगाला मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत ओम ऍडव्हर्टाइझर्स कंपनीने कायद्याच्या कचाट्यात अडकवलं आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाची जाहिरात राज्य परिवहन बसस्थानकांवर प्रदर्शित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या जाहिरात कंपनीने निवडणूक आयोगाच्या परवानगीचे कागदपत्र सादर केले आहेत, त्यानुसार भाजपच्या जाहिराती प्रदर्शित करण्याचे आदेश मुंबई मध्यवर्ती कार्यालयाने पारित केले आहेत. Body:
नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या मोदी चित्रपटावर बंदी आणि नमो टीव्हीवर बंदी आणणाऱ्या निवडणूक आयोगाला राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत ओम ऍडव्हर्टाइझर्स कंपनीने कायद्याच्या कचाट्यात अडकवलं आहे. यामुळे या जाहिरात कंपनीने राज्य परिवहन बसस्थानकावरील होर्डिंगवर भाजपच्या जाहिराती प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा करून घेतला आहे. या जाहिरात कंपनीने त्यासंबंधीचे कागदपत्र आणि निवडणूक आयोगाच्या परवानगीचे कागदपत्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सादर केले आहेत. यापार्श्वभूमीवर महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाने आदेश पारित केले आहेत. यामुळे भाजपच्या जाहिराती सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाण असलेल्या बसस्थानकांमध्ये झळकणार हे स्पष्ट झालं आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाला देण्यात आले होते. मात्र परवानाधारकाने निवडणूक आयोगाची परवानगी घेतल्यानंतर आणि परवानगी घेतल्याचे कागदपत्र सादर केल्यानंतर परवानाधारकास भाजपच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास परवानगी देण्यात आल्याचे आदेश मध्यवर्ती कार्यालयाने ९ एप्रिल रोजी पारित केले आहेत. या आदेशानुसार आता ओम ऍडव्हर्टाइझर्स यांची बसस्थानकांवर होर्डिंग्जद्वारे जाहिरात प्रसारित करण्याकरता १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० या कालावधीसाठी अधिकृत परवानाधारक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार जाहिरातीचे अधिकार या कंपनीने राखून ठेवले असून भाजपशी जाहिरातींबाबत या कंपनीने करार केला आहे. राज्य परिवहन महामंडळ आणि भारतीय जनता पार्टी या दोघांशी करार केला आहे. भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कंपनीने कायद्याचा अभ्यास करून निवडणूक आयोगासह राज्य परिवहन महामंडळाला कचाट्यात अडकवत जाहिरातींसाठी आपले इप्सित साध्य करून घेतले आहे. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.