धुळे - चाळीसगाव रोड पोलिसांनी शहरात दोन ठिकाणी छापा टाकला. यामध्ये गोमांसासह एक वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शहराजवळील जामचा मळा भागात एक वाहन बेवारस स्थितीत उभे असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी चाळीसगावरोड पोलीस ठाण्याच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने याठिकाणी छापा टाकला असता या वाहनात गोमांस आढळून आले. हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच शंभरफुटी रोडवरील एका घरवजा गोदामावर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी ५३ जीवंत गोवंशांसह गोमांस जप्त करण्यात आले आहेत. हे गोदाम मुस्ताक शेख यांचे असल्याची माहिती मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून गोमांस जप्त करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे.