ETV Bharat / state

अनिल गोटे यांचा आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला - राजीनामा

अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. या चारही आमदारांचे राजीनामे आज विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. त्यात भाजपचे अनिल गोटे, शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव यांचा समावेश आहे.

अनिल गोटे यांचा राजीनामा स्वीकारला, राजकीय वर्तुळात खळबळ
author img

By

Published : May 15, 2019, 7:03 PM IST

धुळे - लोकसभा निवडणुकीपूर्वी धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर आज (बुधवार) हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. गोटे यांचा राजीनामा स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी केली होती. धुळे महापालिका निवडणुकीपासून अनिल गोटे हे नाराज होते. लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला होता. तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील त्यांनी राजीनामा दिला होता. भाजपनेदेखील त्यांच्यावर कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली होती. मात्र, आता विधानसभा अध्यक्षांनी देखील अनिल गोटे यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. या चारही आमदारांचे राजीनामे आज विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. त्यात भाजपचे अनिल गोटे, शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव यांचा समावेश आहे.

दरम्यान, ज्या आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोट निवडणूक होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी करतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Intro:लोकसभा निवडणुकीपूर्वी धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्या या आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला होता. मात्र अनिल गोटे यांचा राजीनामा अर्ज मंजूर करण्यात आला आहे यामुळे अनिल गोटे हे आता माजी आमदार झाले आहेत. गोटे यांचा राजीनामा स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी करतात याकडे आता सगळ्यांच लक्ष लागून आहे.Body:धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकित पक्षाविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी केली होती. धुळे महापालिका निवडणुकीपासून अनिल गोटे हे नाराज झाले होते. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यानंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला होता. तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील त्यांनी राजीनामा दिला होता. भाजपने देखील त्यांच्यावर कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली होती. मात्र आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील अनिल गोटे यांचा राजीनामा स्वीकारल्याची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळत आहे.अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदार पदाचे राजीनामे दिले होते या चारही आमदारांचे राजीनामे आता विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. त्यात भाजपाचे अनिल गोटे शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव यांचा समावेश आहे. दरम्यान ज्या आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोट निवडणूक होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.कारण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांमध्ये होणार आहेत परंतु ज्यांची राजीनामे स्वीकारले त्या माजी आमदार झाले आहेत. लोकसभा निवडणुकित विजय झाल्यास ठीक मात्र पराभव झाल्यास अनिल गोटे विधानसभा निवडणुकीला उमेदवारी करतील का आणि कोणत्या पक्षाकडून ते उमेदवारी करतात याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे. अनिल गोटे यांचा राजीनामा स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.