धुळे - मी जनसंघ, शेतकरी संघटना आणि भारतीय जनता पक्ष या माध्यमातून कामाला सुरुवात केली. मात्र माझ्या काळचा संघ राजकारणात लुडबुड करत नसे. आज ती परिस्थिती राहिली नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मीडियावर निर्बंध घातलीत हे लक्षण चांगलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन बदलला आहे, अशी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सणसणीत टीका केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला यावेळी बोलताना अनिल गोटे म्हणाले, जो पक्ष मला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षाकडून मी निवडणूक लढवेन. माझा कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही. सत्ताधारी पक्ष केसाने गळा कापतो मात्र मान फिरवल्या वरच आपला गळा कापला आहे हे कळते.
यावेळी बोलताना अनिल गोटे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका केली. यावेळी बोलताना अनिल गोटे म्हणाले मी जनसंघ, शेतकरी संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. मात्र माझ्या काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणात लुडबुड करत नसे. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. ज्या लोकांचा हिंदूंच्या प्रश्नांशी संबंध नाही अशा लोकांना पक्षात घेऊन काय उपयोग, असे सांगताना अनिल गोटे यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी मधल्या अनेकांच्या पक्ष प्रवेशावर टीका केली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मीडियावर निर्बंध घातलीत हे लक्षण योग्य नसून यामुळे राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. महाराष्ट्रातील जनता वेडी नसून ती वेळीच धडा शिकवेल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.