ETV Bharat / state

धुळ्यात पावसाची संततधार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - अक्कलपाडा धरण

शुक्रवारी रात्रीपासून धुळ्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

धुळ्यात पावसाची संततधार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
author img

By

Published : Aug 9, 2019, 10:31 AM IST

धुळे - शहरासह जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. धरणातील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असून अक्कलपाडा धरणातून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पांझरा नदीपात्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धुळ्यात पावसाची संततधार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हवामान खात्याने धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे. तसेच या पावसामुळे साथीचे आजार वाढू शकतात. यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे तसेच कोणतीही मदत लागल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

शिरपूर तालुक्यातील अरुणावती नदीला तब्बल 4 वर्षांनी पूर -

जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात गेल्या 24 तासात 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अरुणावती नदीला पूर आला आहे. अरुणावती नदीला तब्बल 4 वर्षांनी पूर आल्याने नागरिकांनी हा पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती. नागरिकांना जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहे. या पावसामुळे अरुणावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे शिरपूर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात गेल्या 24 तासात 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अरुणावती नदीला पूर आला आहे. प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.Body:धुळे जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ती पावसाची नोंद झाली आहे. शिरपूर तालुक्यात गेल्या 24 तासात 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शिरपूर तालुक्यातील अरुणावती नदी ला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरुणावती नदीला तब्बल 4 वर्षांनी पूर आल्याने नागरिकांनी हा पूर पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली होती. दरम्‍यान प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आल आहे. या पावसामुळे अरुणावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान यामुळे शिरपूर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.