ETV Bharat / state

Girish Mahajan on NCP Crisis :....म्हणून अजित पवारांनी बंडखोरी केली; गिरीश महाजनांनी थेटच सांगितले - Political Crisis In NCP

शरद पवारांना मुलीचा मोह अनावर झाला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सुप्रिया सुळे यांना पुढे केले जात होते. अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याला बाजूला सारण्यात आले होते. या कौटुंबिक वादामुळेच अजित पवारांनी बंडखोरी केली, अशी टीका धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

Rebellion of Ajit Pawar
Rebellion of Ajit Pawar
author img

By

Published : Jul 5, 2023, 7:11 PM IST

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

धुळे : अजित पवारांनी कौटुंबिक वादाला कंटाळून बंडखोरी केली, अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांना दिली. पळासनेर अपघातातील जखमींची विचारपूस केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा मोटरसायकलीस बांधून फरफटत नेत धिंड काढली. शिरपूर तालुक्यातील पळासनेर अपघातातील जखमींची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली.

अपघाताची सखोल चौकशी : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमींची धुळे जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन विचारपूस केली. जखमी झालेल्या रुग्णांमध्ये दोन जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे इतर जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केला जाईल असे, देखील या वेळेस मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी या संपूर्ण अपघाताची भीषणता लक्षात घेता प्रथमदर्शी कंटेनर चालकाच्या जबाबदारीमुळे हा अपघात झाला. या संपूर्ण अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. धुळे जिल्ह्यातील बेटावर येथे मंगळवारी कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांसह इतर बंडखोरांच्या विरोधात मोटार सायकल रॅली काढून निषेध नोंदविला.

44 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा : शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 54 आमदार निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहाटेचा शपथविधी फेल गेल्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना हादरा दिला. राष्ट्रवादीत फुट पाडत, आमदारांना सोबत घेऊन शिंदे गट - भाजप सोबत सत्तेत सामिल झाले. 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला होता. तसेच पक्ष आणि चिन्हावर दावा केला. अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दोन दिवसांची मुदत दिली. तसेच पक्ष आणि चिन्ह कोणाचा हे ठरवण्यासाठी जनतेच्या दरबारात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यापूर्वीच अजित पवारांनी 44 आमदारांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञा पत्र घेऊन शरद पवारांना धक्का दिला आहे.

हेही वाचा - AJit Pawars NCP Meeting: वसंतदादा यांना असेच वाईट वाटले असेल...-छगन भुजबळ यांची शरद पवारांवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.