ETV Bharat / state

सुरत-नागपूर महामार्गावर कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; एक जण ठार - एक जण ठार झाला

शहराजवळील सुरत-नागपूर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याने दोघा व्यक्तींची ओळख पटू शकली नाही. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघातग्रस्त कार आणि दुचाकीचे छायाचित्र
author img

By

Published : Jun 15, 2019, 7:07 PM IST

धुळे- शहराजवळील सुरत-नागपूर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याने दोघा व्यक्तींची ओळख पटू शकली नाही. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघातग्रस्त कार आणि दुचाकीचे दृष्य

धुळे शहराजवळील सुरत नागपूर महामार्गावर, डी एन क्यू ३७३१ क्रमांकाची मारुती कार सुरतवरुन अक्कलपाडा गावाकडील वळण रस्त्यावरुन धुळ्याकडे जात होती. त्याचवेळी बाईकवर २ व्यक्ती धुळ्याहून साक्रीकडे जात होते. या दरम्यान कार आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. यात मोटारसायकलवरील एकाला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता.

या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मदतकार्य करीत जखमीला तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवले. या अपघातातील दुसऱ्या जखमीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Intro:धुळे शहराजवळील सुरत नागपूर महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मात्र मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याने दोघ व्यक्तींची ओळख पटू शकलेली नाही. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. Body:धुळे शहराजवळील सुरत नागपूर महामार्गावर सुरतहून अक्कलपाडा गावाकडून वळण रस्त्यावर मारुती कार ( क्रमांक डी एन क्यू ३७३१) हि धुळ्याकडे येत होती. त्याच वेळी ए एम टी बाईकवर २ व्यक्ती धुळ्याहून साक्री कडे जात असतांना कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यात मोटारसायकलवरील एकाला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांनी मदतकार्य करीत जखमीला तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवलं. या अपघातातील दुसऱ्या जखमीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.