ETV Bharat / state

एसटी बसचा ब्रेक फेल...चालकाचे प्रसंगावधान...थरार सीसीटीव्ही कैद - driver

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळेनेर गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावर नाशिकहून नंदुरबारकडे जाणारी परिवहन मंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाले. टोल नाक्यावर समोर एक कार टोल गेटकडे जात असतानाच बस चालकाने प्रसंगावधान राखत बस दुभाजकावर नेत रस्त्याच्या बाजूला नेली व काही अंतरावर गेअरच्या सहाय्याने वाहनावर नियंत्रण मिळविले. चालकाचे जर लक्ष नसते व त्याने नियंत्रण मिळविले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. ही बाब तेथील सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाली आहे.

ब्रेक फेल
author img

By

Published : Feb 12, 2019, 6:25 PM IST

Updated : Feb 12, 2019, 8:28 PM IST

धुळे - साक्री तालुक्यातील पिंपळनेर टोल नाक्याजवळ परिवहन महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अपघात टळला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या बसमध्ये जवळपास ६० पेक्षा जास्त प्रवासी होते. या घटनेमुळे परिवहन महामंडळाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

ब्रेक फेल
या घटनेमुळे एसटी आगार कार्यशाळेच्या कामाचे वाभाडे समोर आले आहेत. एसटीच्या आगार कार्यशाळेत दररोज एसटीची किती प्रामाणिक तपासणी होते. ब्रेक, हेड लाईट, ऑईल तपासणी या गोष्टी खरोखरच प्रामाणिकपणे तपासल्या जातात का? याविषयी प्रवासी, नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे. आगारातून बस निघण्यापूर्वी तिची तपासणी होणे गरजेचे असते मात्र ते वेळेवर होत नसल्याने अशा घटना घडू शकतात. या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन बसची तपासणी नियमितपणे होणे गरजेचे आहे. अन्यथा भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
undefined

ANCHOR:     धुळे :   साक्री तालुक्यातील पिंपळनेर टोल नाक्याजवळ परिवहन महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाले मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे होणार भीषण अपघात टळला. हि घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या बस मध्ये जवळपास ६० पेक्षा जास्त नागरिक होते, मात्र सुदैवाने हा अपघात टळला असून या घटनेमुळे परिवहन महामंडळाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

VOICE:           धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळेनेर गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावर  नाशिकहून नंदुरबारकडे जाणारी परिवहन मंडळाच्या बसचे अचानक ब्रेक फेल झाले.टोल नाक्यावर समोर पांढऱ्या रंगाची कार टोल गेट कडे जात असतानाच बस चालकाने प्रसंगावधान राखत बस दुभाजकावर नेत रस्त्याच्या बाजूला नेली व काही अंतरावर गेअरच्या सहाय्याने वाहनावर नियंञण मिळविले. चालकाचे जर लक्ष नसते व चटकन नियंञण मिळविले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती.हि बाब तेथील सिसिटिव्ही कँमेऱ्यात कैद झाली आहे.या घटनेनं एसटी च्या आगार कार्यशाळेच्या कामाचे वाभाडे समोर आलेत.एसटीच्या आगार कार्यशाळेत दररोज एसटीची किती प्रामाणिक तपासणी होते.ब्रेक, हेड लाईट, ऑईल तपासणी या गोष्टी खरोखरच प्रामाणिकपणे तपासल्या जातात का?याविषयी प्रवाशी, नागरिकांनी शंका उपस्थित केलीय. आगारातून बस निघण्यापूर्वी तिची तपासणी होणे गरजेचे असते मात्र ते वेळेवर होत नसल्याने अश्या घटना घडू शकतात. या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन बसेसची तपासणी नियमितपणे होणे गरजेचे आहे. अन्यथा भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Last Updated : Feb 12, 2019, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.