ETV Bharat / state

धुळ्याच्या अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा वाढत आहे. यामुळे धरणातून पांझरा नदीत १०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेक विसर्ग
author img

By

Published : Sep 14, 2019, 5:42 PM IST

धुळे - जिल्ह्यातील साक्री परिसरात गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. शनिवारी या अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अक्कलपाडा धरणातून विसर्ग सुरु

हेही वाचा - नांदेडच्या विष्णुपूरी धरणातून एक तास पाण्याचा विसर्ग

२ दिवसांपासून धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री माळमाथा परिसरात दमदार पाऊस सुरु आहे. यामुळे या भागातील जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यामुळे अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग पांझरा नदीत सुरु करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. शनिवारी अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रातन जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान सतत सुरु असलेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

हेही वाचा - तोतलाडोह धरण भरल्याने नागपुरकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले

Intro:धुळे जिल्ह्यातील साक्री परिसरात गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा वाढला असून शनिवारी या अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना नदीकाठी न जाण्याच आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Body:गेल्या २ दिवसांपासून धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री माळमाथा परिसरात दमदार पाऊस सुरु असून यामुळे या भागातील जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणात पाण्याच्या क्षमतेत वाढ झाली असून ७० टक्के पाण्याची क्षमता असल्याने अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पांझरा नदीत हे पाणी विसर्ग करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. शनिवारी अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी नदी पात्रात न जाण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान सतत सुरु असलेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.