धुळे - होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने देशी आणि विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून ११ लाख ३३ हजार ८२४ रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. शहरातील शिवतीर्थ चौकात पोलिसांनी ही कारवाई केली.
शेख फरीद अब्दुल लफीक (वय ३३) आणि रामदास रविदास चत्रे, अशी ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहेत. या दोघांविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अवैधरित्या मद्यसाठा जप्त करण्याच्या कारवाया वाढल्या आहेत. हा मद्यसाठा नेमका कुठून येतो? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.