चिमूर ( चंद्रपूर ) - चिमूर नगर परिषदेच्या निर्मीती नंतर नगर परीषद क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सफाई करीता निच्छित अशा कालावधी करीता विविध कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले. या कंत्राटदाराकडे नाली सफाई, घटांगाडी कामगार, सफाई कामगार तथा कचरा गाडीचे ड्रायव्हर इत्यादी काम करणाऱ्या कामगारांना अनियमीत पगार होत असल्यांने आर्थीक ओढातान सहन करावी लागते. याचा उद्रेक होऊन वेळेवर पगाराच्या मागणीसाठी सर्व सफाई कामगारांनी आज कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेऊन नगर परीषदेपुढे ठिय्या मांडला.
नगर परीषदेमध्ये नाला सफाई, घंटागाडी, सफाई कामगार तथा गाडीचे ड्रायव्हर असे मिळून एकुण जवळपास ७० कामगार कंत्राटदाराकडे काम करतात. या कामाच्या मोबदल्यावर सर्व सफाई कामगारांच्या कुंटुबाचे भरण पोषण चालते. मात्र, नगर परीषद क्षेत्रातील महत्वाचे काम करणारे कामगारांना नियमित मागील वर्षापासुन पगार मिळत नसल्याने त्यांना आर्थीक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नियमित प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार देण्याची मागणी नेहमीच कंत्राटदाराला कामगाराकडून केल्या जात होती. मात्र, कंत्राटदार तथा नगर परीषदेचे स्वच्छता विभाग या कामगारांच्या मागणीकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत होता.
सफाई कामगारांच्या न्याय मागण्याकडे कंत्राटदार तथा प्रशाषणा कडून दुर्लक्ष झाल्याने कामगारात रोष निर्माण झाला. त्यामूळे प्रशासणानाने १८ डिसेंबरला मागणी त्वरीत पुर्ण करावी अन्यथा १९ डिसेंबरला काम बंद आंदोलन करू असा इशारा देणारे पत्र दिले. या पत्राकडेही प्रशासणाने दुर्लक्ष केल्याने अखेर सर्व सफाई कामगारांनी काम बंद करून नगर परीषदे पुढे ठीय्या मांडला. या आंदोलनात धर्मेंद्र उगले, विलास मेश्राम, राजकुमार मड़ावी, शशांक सहारे, राजू गड्ढे, प्रभु वाघ, संगीता मेश्राम, पाटिल, महादेव खांडरे, मनोहर सावसाकडे, विशाल मड़ावी, बादल मड़ावी, अक्षय खोबर, शंकर भानारकर यांचेसह सर्व कंत्राटी सफाई कामगार सहभागी झाले होते.
नगर परीषदेत कंत्राटी कामगार यांचे नियमीत जिपीएफ भरणे आवश्यक असते, त्या शिवाय मासीक कामांची देयके अदा केली जात नाहीत. मात्र, कंत्राटदार व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने देयके अदा केले जाते. जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या या कामगांराच्या भविष्याचे काय? असा प्रश्न केला जात असुन काही व्यक्ती कचऱ्यातुनही मलिदा खात असल्याची चर्चा आहे .