ETV Bharat / state

चंद्रपूर जि.प. अध्यक्षांकडून आचारसंहितेचे उल्लंघन, काँग्रेसची तक्रार

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या घुग्गुस येथे सार्वजनिक ठिकाणी बेंच लावण्यात आले. हा प्रचार करण्याचा नियमबाह्य प्रकार असल्याने काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले बेंच
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:44 AM IST

चंद्रपूर - निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतरही राजकीय पक्षांचा वेगवेगळ्या मार्गाने प्रचाराचा प्रयत्न सुरु आहे. असाच एक प्रकार घुग्गुस येथे समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या घुग्गुस येथे सोमवारी भाजपच्या पक्षध्वजाचा रंग असलेले आणि नाव असलेले बेंच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. या बेंचवर याच क्षेत्रातील नीतू चौधरी याचे नाव आहे. हा प्रचार करण्याचा नियमबाह्य प्रकार असल्याने काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन

महाराष्ट्र विधानसभेच्या निवळणुका जाहिर झाल्या आहेत. मात्र, घुग्गुस येथे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. भाजपचे नेते देवराव भोंगळे यांचे नाव असलेले बेंचेस लावण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. घुग्घुस येथील अमराई वॉर्ड क्र 01 येथे चारचाकी पिकअप व्हॅनमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. नीतू विनोद चौधरी यांच्या नावाची पाटी असलेली तसेच भाजप पक्षाचे झेंड्याचा रंग असलेल्या सीमेंटचे बेंच जागोजागी लावण्यात आले. यावर स्थानिक काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

या प्रकाराची तक्रार घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी चंद्रपुर विधानसभा निवडणुक अधिकारी मनोहर गव्हाळ यांच्याकडे लिखित तक्रार केली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार तसेच तहसीलदारांना झालेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.

Intro:चंद्रपुर : निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतरही राजकीय पक्षांचा वेगवेगळ्या मार्गानं प्रचाराचा प्रयत्न सुरु आहे. असाच एक प्रकार घुग्गुस इथं समोर आलाय. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांचं कार्यक्षेत्र असलेल्या घुग्गुस इथ आज भाजपच्या पक्षध्वजाचा रंग असलेले आणि नाव असलेले बेंच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. या बेंचवर याच क्षेत्रातील नीतू चौधरी याचंही नाव आहे. हा प्रचार करण्याचा नियमबाह्य प्रकार असल्यानं काँग्रेसनं याची निवडणूक अधिका-यांकडे तक्रार केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवळणुका जाहिर झाल्या असून 21 सप्टेंबर रोजी राज्यभरात आचारसंहिता लागू झालेली आहे. मात्र, घुग्घूस येथे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. भाजपचे नेते देवराव भोंगळे यांचे नाव असलेले बेंचेस लावण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. घुग्घुस
येथील अमराई वॉर्ड क्र 01 येथे चारचाकी पिकअप व्हॅनमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. नीतू विनोद चौधरी यांच्या नावाची पाटी असलेली तसेच भाजप पक्षाचे झेंड्याचा रंग असलेल्या सीमेंटचे बेंच जागोजागी लावण्यात आले. यावर स्थानिक काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
या प्रकाराची तक्रार घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी चंद्रपुर विधानसभा निवडणुक अधिकारी मनोहर गव्हाळ यांच्याकडे लिखीत तक्रार केली तसेच जिल्हाधिकारी कुणाल खेमनार तसेच तहसीलदार यांना झालेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.