ETV Bharat / state

'आम्हाला नकोय दारूचे दुकान', माथोली गावातील महिलांचा एल्गार - दारूचा अवैध व्यवसाय

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्येही दारूबंदी घोषित करण्यात आली. मात्र, चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दारूची उघडपणे विक्री होत आहे. माथोली या गावात एक देशी दारूचे दुकान सुरू झाले आहे. या विरोधात स्थानिक महिलांनी एल्गार पुकारला आहे.

माथोली गावातील देशी दारूचे दुकान
author img

By

Published : Sep 8, 2019, 6:51 PM IST

चंद्रपूर - दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत कायद्यात दुरुस्ती केली आहे. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्येही दारूबंदी घोषित करण्यात आली. मात्र, चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दारूची उघडपणे विक्री होत आहे.

देशी दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार

माथोली या गावात एक देशी दारूचे दुकान सुरू झाले आहे. या विरोधात स्थानिक महिलांनी एल्गार पुकारला आहे. ग्रामसभेत याबाबत ठराव घेण्यात आला. या दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. 1 एप्रिल 2015 मध्ये चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. तोपर्यंत चंद्रपूर जिल्हा हा दारूविक्रीमधून सर्वाधिक महसूल देणारा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा होता. दारूबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी होऊ लागली. विशेषतः यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. काही पोलिसांना हाताशी धरून दारूचा अवैध व्यवसाय जिल्ह्यात चांगलाच फोफावला आहे.

हेही वाचा - राजकीय नेत्यांच्या नव्हे तर मतदारांच्या भरवशावर खासदार झाले; नवनीत राणांचा विरोधकांना टोला

याप्रकाराला आळा घालता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाने, 28 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949' कायद्यामध्ये दुरुस्ती केली. त्यानुसार वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर या तीनही जिल्ह्यांत पूर्णपणे दारूबंदी घोषित केली.

हेही वाचा - 'क्राईम कॅपिटल' नागपूरमध्ये आईसह चिमुरड्याचा बत्त्याने ठेचून खून

असे असताना यवतमाळ माथोली या गावात देशी दारूच्या दुकानाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. गावातील अनेक पुरूष आणि तरुण मुले दारूच्या आहारी गेली आहेत. परिणामी गावात दारूचे दुकान नको, अशी भूमिका येथील महिलांनी घेतली आहे.
श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्ष डॉ. पारोमिता गोस्वामी यांनी देखील दारू विक्रीबाबत आक्षेप घेतला आहे. हे दुकान तत्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Intro:चंद्रपुर : दारूबंदीच्या जिल्ह्यांत कडक अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलत यात दुरुस्ती केली आहे. यामध्ये दारूबंदी जिल्ह्याच्या लगत असलेल्या दुसऱ्या जिल्ह्यांना कोरडे जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे असताना चंद्रपुर जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या माथोली गावात एक नवे देशी दारूचे दुकान सुरू झाले आहे. या विरोधात स्थानिक महिलांनी एल्गार पुकारला आहे. ग्रामसभेत याबाबत ठराव घेण्यात आला असून या दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी यात करण्यात आली आहे.
1 एप्रिल 2015 मध्ये चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. तोपर्यंत चंद्रपुर जिल्हा हा दारूविक्रीमधून सर्वाधिक महसूल देणारा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा होता. त्यामुळे येथे असलेल्या प्रचंड दारूविक्रीची प्रचीती येते. दारूबंदीच्या जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी होऊ लागली. यासाठी एक रॅकेट तयार झाले. काही पोलिसांना हाताशी धरून हा अवैध व्यवसाय जिल्ह्यात चांगलाच फोफावला. लगतच्या जिल्ह्यातुनही मोठ्या प्रमाणात दारू आणली जाते. विशेषतः यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातून याची तस्करी केली जाते. पोलिसांनी केलेल्या अनेक कारवाईतुन हे समोर आले आहे. असा दारूसाठा पुरवणाऱ्या काही दुकानांवर कारवाई देखील झाली आहे. तरीही हा प्रकार अद्याप सुरूच आहे. यावर आळा घालता यावा म्हणून महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 28 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णया नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 मध्ये दुरुस्ती तसेच सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर हे तीन जिल्हे पूर्णपणे कोरडे जिल्हे म्हणून घोषित केलेले आहे, तसेच या जिल्ह्यांच्या सीमा क्षेत्रालगत असलेल्या जिल्ह्यांचा विशेष कोरडा विभाग सुद्धा करण्यात आला आहे. असे असताना चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील माथोली या गावात एका देशी दारूच्या दुकानाला परवानगी देण्यात आली आहे आहे. त्यामुळे येथे एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे गावाच्या मध्यभागी हे देशी दारूचे दुकान असून त्याच्या बाजूलाच एक मेडिकल आहे. गावातील नागरिक आणि महिलांना याच मार्गावरून ये-जा करावी लागते. मात्र, आता हे ठिकाण दारुड्यांचा अड्डा बनत चाललेले आहे. येथे मद्यपी दारू पिऊन रस्त्याच्या बाजूला पडून असतात. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो अनेक नागरिक आणि तरुण मुलेसुद्धा दारूच्या आहारी गेलेले आहेत यामुळे अनेक कुटुंबांची कौटुंबिक स्थिरता धोक्यात आली आहे. आमची मुले, नवरे दारू पिऊन येतात आणि घरी धिंगाणा घालतात, आम्हाला मारझोड करतात, म्हणून आम्हाला या गावात दारूचे दुकान नको अशी भूमिका येथील महिलांनी घेतलेली आहे. याबाबत 20 ऑगस्टला ग्रामसभेत ठराव घेऊन या दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्याला लागून हे गाव असल्याने येथे देशी दारू पिण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नागरिक येत आहेत. याबाबत श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्ष ॲड. पारोमिता गोस्वामी यांनी आक्षेप घेतला असून हे दुकान त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Byte : सर्वात शेवटी बाईट हा ॲड. पारोमिता गोस्वामी, अध्यक्ष, श्रमिक एल्गार संघटना यांचा आहे. Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.