ETV Bharat / state

चंद्रपूर दारूबंदीची समीक्षा जलदगतीने, समितीचा अहवाल एक महिन्यात पूर्ण होणार - पालकमंत्री वडेट्टीवार

author img

By

Published : Feb 4, 2020, 3:45 AM IST

जी माहिती या अहवालात समोर येईल ती कॅबिनेटमध्ये मांडली जाईल, असेही वडेट्टीवारांनी यावेळी स्पष्ट केले.

guardian minister of chandrapur
विजय वडेट्टीवार, पालकमंत्री चंद्रपूर

चंद्रपूर - जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर त्याचे नेमके काय परिणाम झाले, याचा अभ्यास करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आदेशानुसार एक समीक्षा समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल येत्या एक महिन्याच्या आत सादर करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात सत्तांतर होताच जिल्ह्यातील दारूबंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. ही दारूबंदी चांगली की वाईट यावर मतमतांतरे आहेत. मात्र, याची समीक्षा करण्याचे पाऊल राज्याचे पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उचलले. त्यानुसार त्यांनी तत्काळ ही समिती नेमण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. ही समिती आपला अहवाल येत्या एक महिन्यात तयार करण्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सोबतच जी माहिती या अहवालात समोर येईल ती कॅबिनेटमध्ये मांडली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'त्या' आरोपीला कठोर शिक्षा द्या, महिला शिक्षकांच्या संतप्त भावना

दारूबंदीमुळे शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या व्यापारात सहभागी झाले आहेत का, कौटुंबिक कलह आणि हिंसाचारात वाढ झाली आहे का, यामुळे दुसऱ्या अंमली पदार्थांचे सेवन वाढले आहे का, जिल्ह्यात किती बनावट दारू पकडल्या गेली, आशा महत्वाच्या बाबींवर या समितीद्वारे अभ्यास केला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे दारुबंदीच्या बाबत लवकरच काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Intro:Body:चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर त्याचे नेमके काय परिणाम झाले याचा अभ्यास करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आदेशानुसार एक समीक्षा समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल येत्या एक महिन्याच्या आत सादर करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात सत्तांतर होताच जिल्ह्यातील दारूबंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. ही दारूबंदी चांगली की वाईट यावर मतमतांतरे आहेत. मात्र, याची समीक्षा करण्याचे पाऊल राज्याचे पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उचलले. त्यानुसार त्यांनी तत्काळ ही समिती नेमण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून ही समिती आपला अहवाल येत्या एक महिण्यात तयार करण्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सोबतच जी माहिती या अहवालात समोर येईल ती कॅबिनेट मध्ये मांडली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दारूबंदीमुळे शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थी याच्या व्यापारात सहभागी झाले आहेत का, कौटुंबिक कलह आणि हिंसाचारात वाढ झाली आहे का, यामुळे दुसऱ्या अंमली पदार्थांचे सेवन वाढले आहे का, जिल्ह्यात कीती बनावट दारू पकडल्या गेली आशा महत्वाच्या बाबींवर या समितीद्वारे अभ्यास केला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे दारुबंदीच्या बाबत लवकरच काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.