ETV Bharat / state

Vijay Vadettiwar अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार; पालकमंत्री वड़ेट्टीवार

सावली तालुका आणि परिसरात (Gosikhurd) गोसीखुर्द प्रकल्पामुळे ( Irrigation) सिंचनाची सोय झाली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे (Crop damage) पीकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत करणार, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री (Vijay Vadettiwar) विजय वड़ेट्टीवार यांनी दिली.

Vijay waddetiwar
विजय वड्डेटीवार
author img

By

Published : Nov 30, 2021, 11:25 AM IST

चंद्रपूर : पाथरी येथे तलाठी कार्यालयाचे लोकार्पण करतांना वड्डेटीवार बोलत होते. ते म्हणाले, या प्रकल्पामुळे सावली तालुका सिंचनामध्ये राज्यात अग्रेसर झाला. गोसीखुर्दचे पाणी आसोलामेंढा येथे आणण्यासाठी आपण संघर्ष केला. अखेर हे पाणी आल्यामुळे येथील शेतकरी सुखावला. एकीकडे ही परिस्थिती असतांना गेल्या पंधरवड्यात अवकाळी पावसाने कहर केला. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या पावसाने हिसकावून घेतला. या नुकसानग्रस्त शेतमालाची प्रशासनासोबत आपण पाहणी केली असून शेतकऱ्यांना शासनाची सर्व मदत मिळवून देऊ. त्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी राज्याचे कृषीमंत्र्यांना सुद्धा या भागात येण्याची विनंती केली असून ते येथे येणार आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त पिकाचा विषय मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला पालकमंत्र्यांच्या हस्ते डोंगरगांव (मस्के) येथे रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन, मंगरमेंढा येथे लहान पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वैशाली शेळके, पं. स सदस्य उर्मिला तराळे, डोंगरगांवचे सरपंच रेवनाथ चिनारकर, चिखलीचे सरपंच रेखा बानबले, मंगरमेंढाचे सरपंच गुरुनाथ निसार आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.