ETV Bharat / state

'चांदा ते बांदा' योजना मुनगंटीवारांनी केवळ आपल्या मतदारसंघातच राबविली, वडेट्टीवारांचा आरोप

'या योजनेसाठी मागील दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्याला २२९ कोटी मिळाले. मात्र, मुनगंटीवार यांनी या योजनेचा ८० टक्के निधी हा आपल्या विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर, मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातच खर्च केला. हे असंतुलन आता दूर होणार आहे.

vijay vadettiwar
'चांदा ते बांदा' योजना मुनगंटीवारांनी केवळ आपल्या विधानसभेत राबविली, वडेट्टीवारांचा आरोप
author img

By

Published : Jan 20, 2020, 4:53 PM IST

चंद्रपूर - 'चांदा ते बांदा' या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणे अपेक्षित होते. मात्र, माजी अर्थमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही योजना केवळ आपल्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातच राबवली, असा घणाघाती आरोप जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा - भाजपला मिळाला नवा कर्णधार.. राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा बिनविरोध

'या योजनेसाठी मागील दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्याला २२९ कोटी मिळाले. मात्र, मुनगंटीवार यांनी या योजनेचा ८० टक्के निधी हा आपल्या विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर, मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातच खर्च केला. हे असंतुलन आता दूर होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यासाठी या योजनेचा निधी खर्च केला जाणार', असेही वडेट्टीवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून ही योजना बंद करण्यात आल्याची चर्चा होती. यावर मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप देखील नोंदवला होता. यावर देखील वडेट्टीवार यांनी भाष्य केले. ही योजना बंद केली नसून केवळ अफवा आहे. उलट आम्ही याची व्याप्ती आणखी वाढवणार आहोत, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - निर्जिव मूर्तीपेक्षा जीवंत माणसे महत्वाची - प्रकाश आंबेडकर

'दारूबंदी हटविण्याचा निर्णय जनता घेणार'

जिल्ह्यातील दारू बंदी हटवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी चुकीची माहिती देऊ नये, असे आवाहन दारू बंदीच्या प्रणेत्या अ‌ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले होते. जिल्ह्याची दारूबंदी उठवायची की नाही हे जनता ठरवेल, असे प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी दिले.

Intro:चंद्रपूर : चांदा ते बांदा ही योजनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणे अपेक्षित होते. मात्र, माजी अर्थमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही योजना केवळ आपल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातच राबविली. असा घणाघाती आरोप राज्याचे पुनर्वसन आणि इतर मागासवर्ग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

चांदा ते बांदा योजनेसाठी मागील दोन वर्षात चंद्रपुर जिल्ह्याला 229 कोटी मिळाले पण मुनगंटीवार यांनी या योजनेचा 80 टक्के निधी हा आपल्या विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर, मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातच खर्च केला. हे असंतुलन आता दूर होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यासाठी या योजनेचा निधी खर्च केला जाणार आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. मागील काही दिवसांपासून चांदा ते बांदा योजना बंद करण्यात आल्याची चर्चा होती. यावर मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप देखील नोंदवला होता. यावर देखील वडेट्टीवार यांनी भाष्य केले. ही योजना बंद केली नसून याची चर्चा ही केवळ अफवा आहे. उलट आम्ही याची व्याप्ती आणखी वाढविणार आहो असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

दारूबंदी हटविण्याचा निर्णय जनता घेणार

जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी चुकीची माहिती देऊ नये असे आवाहन दारुबंदीच्या प्रणेत्या एड. पारोमिता गोस्वामी यांनी केले होते. जिल्ह्याची दारूबंदी उठवायची की नाही हे जनता ठरवेल असा सूचक उत्तर वडेट्टीवार यांनी दिले.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.