चंद्रपूर : विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याबाबतचे शासकीय विधेयक 28 डिसेंबरला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आले. या विधेयकातील तरतुदींना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) आणि विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार ( BJP leader Sudhir Mungantiwar )यांनी कडाडून विरोध केला. या विधेयकामुळे प्र-कुलपती म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे ( Minister of Higher and Technical Education ) सर्वाधिकार जाणार आहेत. त्यामुळे कुलगुरु हे पद रबरी स्टॅम्प ठरणार आहे. त्याचबरोबर हे विधेयक राज्यपालांचा अवमान करणारे देखिल आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे न ऐकता गोंधळात हे विधेयक राज्य सरकारने रेटून नेले. ही लोकशाहीच्या मुल्यांची अवमानना ( Contempt for the values of democracy ) आहे. विधीमंडळाची दोन्ही सभागृहे सार्वभौम पवित्र आहेत. अशा पध्दतीने गोंधळात विधेयके पारीत करणे ही लोकशाहीची हत्याच आहे, असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाकडून करण्यात आला.
तसेच हे विधेयक राज्य सरकारने मागे घेऊन त्यावर पुनर्विचार करावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघूवीर अहीर, मिथिलेश पांडे, श्रीनिवास जंगम, सुनिल डोंगरे, यश बांगडे, कुणाल गुंडावार, स्नेहीत लांजेवार, रामनारायण रवीदास, राहूल पाल, राजेश यादव, मनोज पोतराजे, अभि वांढरे, आकाश मस्के, मंडळ अध्यक्ष संजय पटले, गणेश रामगुंडेवार यांचा सहभाग होता.
हेही वाचा - रितेश-जेनेलियाची सहकुटुंब ताडोबा सफारी.. वाघोबाच्या दर्शनासाठी अभयारण्यात दोन दिवस मुक्काम
University Reform Bill : विद्यापीठ सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करावा; भाजयुमोची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - विद्यापीठ सुधारणा विधेयक
सभागृहात कोणतीही चर्चा न करता गोंधळात नविन विद्यापीठ कायदा ( University Reform Bill ) पारीत केल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या ( BJP Yuva Morcha ) वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Chandrapur Collector Office) निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.