चंद्रपूर- राजूरा तालूक्यात लग्नाच्या पत्रीका वाटप करण्यासाठी जात असलेल्या युवकाचा अपघातात मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. दोन दुचाकीच्या धडकेत युवकासह त्याच्या मित्राचाही मृत्यु झाला आहे. दोन्ही युवक हे मित्र असल्याची माहिती समोर आली असून या दोगांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला होता.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान रामपूर-माथरा मार्गावर हा अपघात झाला. राजुरा तालूक्यातील गोवरी येथील संतोष लांडे हे लग्नाच्या पत्रिका वाटून घराकडे जात होते. संतोषचे १२ एप्रिल रोजी लग्न होते. तर, प्रीतम परसुटकर हा गोवरी येथून काही कामानिमित्त राजुरा येथे जात होता. माथरा जंगलात दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेने गोवरी गावावर शोककळा पसरली आहे.