चंद्रपूर- विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द ते मोखाळा मार्गावर घडली.
तिघे मित्र नवीन स्कुटी घेतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मोखाळा या गावाकडे २४ नोव्हेंबरच्या रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान फिरायला निघाले होते. प्रवासादरम्यान वाटेतच विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्पर क्र. (एम.एच. ३१ सी.बी १६६५) ने तिघांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये आतिष शेडमाके (वय.२०) हा जागीच ठार झाला तर नागेश कोडापे (वय.२२) याला नागपूरच्या रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. तर, अमित मेश्राम (वय.२०) हा गंभीर जखमी असून नागपूर येथे उपचार घेत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टिप्पर व स्कुटी जप्त केली आहे. मात्र, सदर टिप्पर चालक हा घटनस्थळावरून फरार झाला आहे.
हेही वाचा- सर्पदंशाने महिलेचा मृत्यू, सावली तालुक्याच्या रैयतवारीतील घटना