ETV Bharat / state

चंद्रपूर : नाफेडतर्फे तूर खरेदी सुरू; प्रति क्विंटल सहा हजार भाव

शासनाने तूर खरेदीसाठी प्रति क्विंटल रुपये सहा हजार दर मंजूर केला असून चंद्रपूर जिल्ह्यात नाफेडतर्फे तूर खरेदी केली जात आहे.

author img

By

Published : Feb 2, 2021, 10:24 PM IST

tur purchased by nafed in chandrapur
चंद्रपूर : नाफेडतर्फे तूर खरेदी सुरू; प्रति क्विंटल सहा हजार भाव

चंद्रपूर : हंगाम 2020-21 मध्ये शासनाने तूर खरेदीसाठी प्रति क्विंटल रुपये सहा हजार दर मंजूर केला आहे. तूर खरेदीसाठी केंद्र शासनाने नाफेडची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली असून नाफेडच्या वतीने राज्यामध्ये पणन महासंघामार्फत तूर खरेदी सुरू आहे. तूर खरेदीचा नोंदणी कालावधी 28 डिसेंबर 2020 पासून सुरू झाला आहे. तूर खरेदी 20 जानेवारी ते 19 एप्रिल 2021 या कालावधीत करण्यात येणार आहे.

ज्या तालुक्यात खरेदी केंद्र सुरू नाही, त्या तालुक्यांना खालीलप्रमाणे दिलेल्या खरेदी केंद्रावर तालुकानिहाय जोडण्यात आले आहे. चंद्रपूरसाठी भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मुल, वरोरा खरेदी केंद्रासाठी वरोरा तालुका, चिमुर खरेदी केंद्राला ब्रम्हपुरी, सिंदेवाही व नागभिड, गडचांदुर खरेदी केंद्राला कोरपना व जिवती, राजुरा खरेदी केंद्राला गोंडपिपरी व बल्लारपूर तालुके जोडण्यात आले आहेत. या सर्व खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करणेसाठी आपले आधारकार्ड, मतदान कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इत्यादी संपुर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी व दिलेल्या मुदतीत तूर विक्रीकरीता खरेदी केंद्रावर जावे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए. आर. गोगीरवार यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात धानासह तुरीचेही उत्पादन बऱ्यापैकी होते. नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. मात्र अनेकदा शेतकऱ्यांना हा भाव मिळण्यापासून डावलण्यात येते अशा तक्रारी प्राप्त होतात. याबाबत प्रशासनाने जास्त सतर्क राहून शेतकऱ्यांची अशी कुठलीही अडचण होऊ नये, याकरिता दक्ष राहणे आवश्यक आहे, अशी भावना शेतकऱ्यामधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा - आमचे गाव आमचे सरकार : गावाच्या राजकरणात नव्या पिढीचा उदय

हेही वाचा - मरणासन्न पडलेल्या लघू उद्योगांना सरकारच्या मदतीची गरज - मधुसूदन रुंगठा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.