ETV Bharat / state

घोडाझरी अभयारण्यात वाघाचा मृत्यू; झुंजीत मृत्यू झाल्याचा अंदाज - Tiger death Ghodazari Sanctuary

घोडाझरी अभयारण्यात आज एक वाघ मृतावस्थेत आढळुन आला. या वाघावरील जखमा बघून मृत्यू दुसऱ्या वाघाच्या झुंजीत झाल्याचा प्राथमीक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Tiger dies in Ghodazari Sanctuary
वाघ मृत्यू घोडाझरी अभयारण्य
author img

By

Published : Feb 28, 2022, 6:49 PM IST

चंद्रपूर - घोडाझरी अभयारण्यात आज एक वाघ मृतावस्थेत आढळुन आला. या वाघावरील जखमा बघून मृत्यू दुसऱ्या वाघाच्या झुंजीत झाल्याचा प्राथमीक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा - अडीच वर्षांनंतर मुहूर्त सापडला : खासदार धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या नागभिड वन परीक्षेत्र अंतर्गत घोडाझरी अभयारण्य आहे. या परिसरात वाघांसह अन्य हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य आहे. घोडाझरी अभयारण्यातील बफर क्षेत्रात येणाऱ्या हुमा बिटमध्ये आज सकाळच्या सुमारास एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या शरिरावर अनेक जखमा होत्या आणि या गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. दुसऱ्या एका वाघासोबतच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात येत आहे. मृत वाघ हा याच परिसरात वावरणारा असल्याचे कळते.

संबंधित मृत वाघाचे शवविच्छेदन हे घटनास्थळी करण्यात येत असून घटनास्थळी जाळण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली असल्यामुळे आपले क्षेत्र राखण्यासाठी वाघांच्या झुंजी होतात आणि अशात वाघांचा मृत्यू देखील होतो.

हेही वाचा - Bear in Vadgaon Chandrapur : वडगाव प्रभागातील अस्वल तीन दिवसात जेरबंद करा; नगरसेवक देशमुख यांचा आंदोलनाचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.