चंद्रपूर - घुग्गुस येथे वर्धा नदीत तीन मुले बुडाल्याची घटना घडली आहे. ही मुले सकाळी पोहायला गेले होते. पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन रामटेके अशी मृतांची नावे आहेत. तर अनिल गोगला, सुजल वनकर ही मुले या घटनेत थोडक्यात बचावली आहेत.
हेही वाचा - 'लव्ह जिहाद' प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपा 'आमने-सामने'; सेनेच्या भूमिकेकडे लक्ष्य
सर्वत्र हळहळ
शुक्रवारी सकाळी घुग्गुस येथील अमराई वॉर्डमधील पाच मुले वर्धा नदीवर पोहायला गेली होती. यापैकी तीन जण खोल पाण्यात गेल्याने बुडाले तर दोघे जण बचावले. पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन रामटेके ही मुले बुडाली. तर अनिल गोगला, सुजल वनकर ही मुले थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच कामगार नेता सय्यद अन्वर आणि सरपंच संतोष नुने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. सध्या मृतदेहांचे शोधकार्य सुरू आहे.
हेही वाचा - कॉमेडियन भारती आणि तिचा पती एनसीबीच्या ताब्यात; ड्रग्स प्रकरणी कारवाई