ETV Bharat / state

धक्कादायक..! शिक्षकाने एका टेम्पोत बसवले ४६ विद्यार्थी - gojoli of gondpipri taluka

विद्यार्थी सकमूर येथे क्रीडा स्पर्धेसाठी गेले होते. विषेश म्हणजे स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांसोबत गेलेले शिक्षक मात्र मागून स्वत:च्या गाडीने येत होते. बसण्यासाठी जागाच नसल्याने हे विद्यार्थी जीव धोक्यात घालून चक्क लोंबकळत प्रवास करत होते.

tempo
शिक्षकाने एका टेम्पोत बसवले ४६ विद्यार्थी
author img

By

Published : Dec 14, 2019, 8:39 PM IST

Updated : Dec 15, 2019, 7:08 PM IST

चंद्रपूर - क्रिडा स्पर्धेसाठी गेलेल्या ४६ विद्यार्थ्यांना एकाच टेम्पोत बसवून क्रीडा स्पर्धेसाठी नेल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथे घडली आहे. हे विद्यार्थी सकमूर येथे क्रिडा स्पर्धेसाठी गेले होते. विषेश म्हणजे स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांसोबत गेलेले शिक्षक मात्र मागून स्वत:च्या गाडीने येत होते.

शिक्षकाने एका टेम्पोत बसवले ४६ विद्यार्थी

बसण्यासाठी जागाच नसल्याने हे विद्यार्थी जीव धोक्यात घालून चक्क लोंबकळत प्रवास करत होते. गोंडपिपरी तालुक्यातच काही दिवसांपूर्वी भंगारपेठ येथे कर्तव्यावर असलेला शिक्षक दारू पिऊन शाळेजवळ पडल्याची संतापजनक घटना समोर आली होती. त्यानंतर आता या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

हेही वाचा - फुल्ल ढोसून झोपले तळीराम गुरुजी; विद्यार्थ्यांची पाटी राहिली कोरी

याप्रकरणी पालकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत केंद्रप्रमुख काळे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मात्र याविषयी काहीच माहीती नसल्याचे म्हटले आहे.

गोजोली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, "तीन दिवसांपासून विद्यार्थी सकमुरला होते. त्यांना नेण्यासाठी ठरवलेले वाहन आले नाही. तसेच बस आणि इतर वाहनही वेळेवर मिळाले नाही. अशावेळी माझ्या ओळखीच्या रस्त्याने जाणाऱ्या टेम्पोला थांबवून त्यामध्ये 20 विद्यार्थ्यांना मी बसायला सांगितले. मात्र, घराकडे जाण्याची घाई असल्याने उर्वरित विद्यार्थीही टेम्पोत बसले. तसेच माझ्या मोटारसायकलीवरही मी काही विद्यार्थ्यांना नेले." वेळेवर वाहन न आल्याने विद्यार्थ्यांना टेम्पोने आणावे लागले असल्याचे स्पष्टीकरण शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिले आहे.

Intro:विध्यार्थी आहेत की गुरंढोरं

एका टेम्पोत कोंबले पन्नास विध्यार्थी;गोंडपिपरी तालूक्यातील प्रकार
चंद्रपुर

क्रिडा स्पर्धेला गेलेल्या चिमुकल्या पन्नास विध्यार्थ्यांना चक्क टेंम्पोत कोंबून आनल्या गेले. टेम्पोचा पायदान्यावर लोंबकळत चिमुकल्यांनी प्रवास केला. गोजोली येथिल जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यासोबत हा जिवघेणा प्रकार घडला आहे.

गोंडपिपरी तालूक्यातून मागिल आठवडाभरात गुरुजींच्या विविध करामती पुढे येत आहेत. कर्तव्यावर असलेल्या भंगारपेठ येथिल शिक्षकाने फुल्ल दारु ढोसली अन शाळे लगत असलेल्या शेतात लोळांगण घातले. याला दोन तिन दिवस उलटले नसतांनाचा धामणगाव येथिल क्रिडा स्पर्धेत वांदग घडले होते. आता गोजोली येथिल जिल्हा परिषदेचा शिक्षकाने चिमुकल्या पन्नास विध्यार्थांना चक्क टेंम्पोत कोंबून नेल्याचा संतापदायक प्रकार समोर आला आहे.
गोंडपिपरी तालूक्यातील सकमुर येथे जिल्हा परिषद शाळेंचे बिटस्तरीय क्रिडा स्पर्धा आटोपल्या. या स्पर्धेत गोजोली येथिल जिल्हा परिषद शाळेतील
विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विध्यार्थ्यांना गावाकडे घेऊन जाण्यासाठी गोजोली येथिल शिक्षकाने टेंम्पो गाडी केली. या गाडीत एक नव्हे दोन नव्हे तब्बल पन्नास चिमुकल्या विध्यार्थांना कोंबले गेले. गाडीत उभे राहण्यापुरतीही जागा नव्हती. काही विध्यार्थ्यांनी टेंम्पोचा पायदानावर उभे राहून प्रवास केला. विध्यार्थ्यांना जिवघेण्या प्रवासाला पाठवून गुरुजी मात्र स्वताचा दूचाकीने निघाले. या प्रकाराने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान याबाबत केंद्रप्रमुख काळे यांना विचारना केली असता या प्रकाराबाबत काहीच माहीती नसल्याचे सांगितले .Body:विडीओConclusion:
Last Updated : Dec 15, 2019, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.