ETV Bharat / state

ताडोबाचे कोअर क्षेत्र आजपासून पर्यटकांकरिता खुले; स्थानिक रोजगाराला मिळणार चालना - Tadoba core area

1 ऑक्टोबरपासून ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिक, वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा अधिकृत उद्घाटन सोहळा या विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

ताडोबाचे कोअर क्षेत्र
ताडोबाचे कोअर क्षेत्र
author img

By

Published : Oct 1, 2021, 2:57 PM IST

Updated : Oct 1, 2021, 3:19 PM IST

चंद्रपूर - ताडोबात सफर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकरिता आनंदाची बातमी आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्र तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीनंतर आज पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. ताडोबाचे प्रकल्प संचालक जितेंद्र रामगावकर यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्याकरिता 15 एप्रिलपासून ताडोबाचे कोअर क्षेत्र पर्यटनासाठी बंद करण्यात आले. यामुळे स्थानिक रोजगारावर मोठा परिणाम झाला होता. अनेक स्थानिक लोकांचा ताडोबात येणाऱ्या पर्यटकांवर उदरनिर्वाह अवलंबून आहे. जिप्सीचालक आणि गाईडच्या माध्यमातून येथे स्थानिक रोजगाराला चालना मिळत असते. यापूर्वी बफर क्षेत्र पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र, कोअर क्षेत्र बंद होते.

ताडोबाचे कोअर क्षेत्र आजपासून पर्यटकांकरिता खुले

हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष : तीन वर्षात ताडोबात पाच वाघांची शिकार तर, 32 वन्यजीवांचा मृत्यू

कोरोनाचे सर्व नियम पाळून ताडोबा खुले

अखेर आज 1 ऑक्टोबरपासून ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याने स्थानिक नागरिक, वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा अधिकृत उद्घाटन सोहळा या विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोनाचे सर्व नियम पाळून हे पर्यटन सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा-ताडोबात २ वाघ शिरले पर्यटकांच्या ताफ्यात, दुचाकीस्वारांचा थोडक्यात वाचला जीव

सचिन तेंडुलकरने तीनवेळा ताडोबाला दिली भेट-
भारतीय संघाचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर तिसऱ्यांदा सप्टेंबर 2021 मध्ये ताडोबातील वाघांच्या भेटीला आला होता. त्याने मदनापूर, अलीझंजा, सिरकाळा बफर क्षेत्रात सफारी केली होती. वाघाच्या दर्शनाने आनंदीत होऊन रिसोर्ट सोडताना सचिन पत्रकारांना म्हणाला होता, की ताडोबा व्याघ्र प्रकल्प ही खूप छान जागा आहे. येथे आल्यानंतर आनंद होतो. तसेच येथील माणसे सुद्धा खूप चांगली आहेत.

हेही वाचा-अखेर वाघाने दिले सचिन तेंडुलकरला दर्शन

Last Updated : Oct 1, 2021, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.