ETV Bharat / state

घरबसल्या घ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे दर्शन, आता सफारी ऑनलाईन - ताडोबा व्याघ्र प्रकल्प

साधारण जानेवारी महिन्यापासून सुरू होणारा चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचा हंगाम यंदा कोरोना सावटामुळे संकटात सापडला आहे. याची भरपाई होऊ शकत नसली तरी जगभरातील व्याघ्रप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींना ताडोबातील वाघोबांशी कनेक्ट करण्याच्या दृष्टीने ताडोबा व्यवस्थापनाने घरबसल्या ताडोबा दर्शनाची सोय केली आहे.

tadoba online jungle safari  ताडोबा जंगल सफारी  ताडोबा व्याघ्र प्रकल्प  ताडोबा जंगल सफारी
आता घरबसल्या घ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे दर्शन, आता सफारी ऑनलाईन
author img

By

Published : Apr 18, 2020, 7:22 PM IST

चंद्रपूर - लॉकडाउनमुळे देशातील सर्वच व्याघ्रप्रकल्प बंद झाले आहेत. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. मात्र, ताडोबाची ही ओढ कायम राहावी यासाठी प्रकल्प संचालनाने वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी ताडोबाची सफर ऑनलाईन केली आहे. म्हणजेच दररोज ताडोबात काय घडतय हे कुठलाही पर्यटक बघू शकणार आहे. यासाठी यू-ट्यूब चॅनेल उघडण्यात आले आहे. वनविभागाचे अधिकारी गस्त घालीत असताना हा व्हिडिओ तयार केला जातो. दुसऱ्या दिवशी तो ऑनलाइन टाकला जातो.

साधारण जानेवारी महिन्यापासून सुरू होणारा चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचा हंगाम यंदा कोरोना सावटामुळे संकटात सापडला आहे. याची भरपाई होऊ शकत नसली तरी जगभरातील व्याघ्रप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींना ताडोबातील वाघोबांशी कनेक्ट करण्याच्या दृष्टीने ताडोबा व्यवस्थापनाने घरबसल्या ताडोबा दर्शनाची सोय केली आहे. 17 एप्रिलपासून या नव्या व्यवस्थेला प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी दिलेल्या www.mytadoba.org किंवा you tube वर tatr4klive या संकेतस्थळावर हजारो प्रेक्षकांनी ताडोबा भ्रमंतीचा आनंद घेतला.

ताडोबा म्हणजे वन्यजीवांची श्रीमंती. मात्र, हंगामाच्या काळात ताडोबा बंद असल्याने व्याघ्रप्रेमी हिरमुसले आहेत. यावर व्यवस्थापनाने कल्पक उपाय केला असून, लॉकडाऊन जारी असेपर्यंत रोज दुपारी 3 वाजता ताडोबाची ही सफर घरबसल्या आपल्या दिवाणखान्यात बसून बघता येणार आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन सफारी सुरू करणारा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प ठरला असून, याची प्रेरणा दक्षिण आफ्रिकेच्या क्रुजर नॅशनल पार्क लाईव्ह स्ट्रीमिंग कार्यक्रमातून घेण्यात आली आहे. यापुढच्या काळातही पर्यटक आणि व्याघ्रप्रेमींचे ताडोबाशी असलेले कनेक्शन कायम रहावे, ही त्यामागची भावना आहे. भ्रमंती दरम्यान सहजपणे वाघोबाचे दर्शनदेखील घरबसल्या होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे ताडोबा प्रकल्प सध्या बंद आहे. पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींची गैरसोय होऊ नये आणि त्यांना घरबसल्या ताडोबा दर्शन घडावे, यासाठी हा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन. प्रवीण यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.