ETV Bharat / state

Tadoba Andhari Tiger Reserve : नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ताडोबा हाऊसफुल!

नाताळ (Christmas) आणि नववर्षाच्या (New Year) पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve) हाऊसफुल झाला आहे. आतापासूनच जानेवारी महिन्यापर्यंतची बुकिंग फुल (Booking Full) झाली आहे.

Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा व्याघ्र प्रकल्प
author img

By

Published : Dec 14, 2021, 6:48 PM IST

चंद्रपूर - नाताळ (Christmas) आणि नववर्षाच्या (New Year) पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve) हाऊसफुल झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असताना पर्यटकांकडून (Tourist) यावर्षी थंड प्रतिसाद मिळेल असे वाटत होते. मात्र, याला बगल देत पर्यटकांनी ताडोबा सफारीला पसंती दिली आहे.

जानेवारीपर्यंतच्या बुकिंग फुल -

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. 1 नोव्हेंबर 2020 ला ताडोबा प्रकल्प हा सुरू करण्यात आला होता. मात्र, एप्रिल महिन्यात पुन्हा लॉकडाऊन लागल्याने प्रकल्प बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा पर्यटकांसाठी पर्यटन सफारी सुरू करण्यात आली. तेव्हापासूनच ताडोबा व्याघ्र प्रकल्प पूर्णक्षमतेने कार्यरत आहे. जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या लाटेमुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे आता ताडोबातील व्याघ्र सफारीचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही. आतापासूनच जानेवारी महिन्यापर्यंतची बुकिंग फुल झाली आहे, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

  • रोजगार वाढण्यास मदत -

ताडोबात सध्या सकाळ आणि सायंकाळी पर्यटन सफारी केली जाते. कोअर आणि बफर क्षेत्रात ही सफारी केली जाते. कोअर क्षेत्रात एका दिवसात 125 युनिट तर बफर क्षेत्रात प्रत्येक गेटवरून आठ युनिट याप्रमाणे पर्यटन सफारी घडवली जाते. एका जिप्सीमध्ये सहाजणांना जाण्याची परवानगी आहे. नाताळ आणि नवावर्षाच्या पार्श्वभूमीवर ताडोबाची सर्व बुकिंग फुल झाली आहे. त्यामुळे स्थानिक रोजगाराला मोठा दिलासा मिळाला आहे. रिसॉर्ट, होम्सटे, हॉटेल, चालक, गाईड या माध्यमातून स्थानिकांना मोठा रोजगार ताडोबातून प्राप्त होतो. कोरोनाच्या काळात ताडोबा बंद असल्याने स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला होता. मात्र, आता ताडोबा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्याने स्थानिक रोजगाराला चालना मिळाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून, मास्क आणि सॅनिटरायझरचा प्रयोग सक्तीचा केलेला आहे. त्याचे पालन करूनच पर्यटकांना व्याघ्रसफारी करता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.