ETV Bharat / state

धक्कादायक; चंद्रपुरात संस्थात्मक विलगीकरणात एकाची आत्महत्या - चंद्रपूर कोरोना न्यूज

चंद्रपुरात क्वारंटाइन केलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे.

suicide
संस्थात्मक विलगीकरणात एकाची आत्महत्या
author img

By

Published : May 30, 2020, 11:34 AM IST

Updated : May 30, 2020, 1:41 PM IST

चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कक्षात दोघांचा मृत्यू झाला. चंद्रपूर येथील श्यामनगर, भगतसिंग चौक येथील रहिवासी असणाऱ्या ३० वर्षीय युवकाने महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहातील कक्षात सकाळी 7.30च्या सुमारास आत्महत्या केली. हा युवक नागपूर येथून आल्यानंतर कक्षामध्ये होता.

दुसऱ्या घटनेत महाविद्यालयाच्या निवासी कक्षामध्ये आपल्या कुटुंबासह असणार्‍या ४० वर्षीय नागरिकाचा प्रकृती अस्वास्थामुळे आकस्मिक मृत्यू झाला. मृत हा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर गावातील आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत यावेळी होते. कुटुंबासोबत त्यांचा सकाळी संवादही झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास ते आराम करत होते. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या दोन्ही मृतांचे कोरोना स्वॅबदेखील घेण्यात आला आहे. या दोन्ही व्यक्तींची प्रकृती स्थिर होती. ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या इमारतीमध्ये अलगीकरणात होते. या दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

Last Updated : May 30, 2020, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.